Babar Azam : 'तू इकडं ये तुला दाखवतो...', Live सामन्यात बाबर आझमची दादागिरी; पाहा Video

Babar Azam Viral Video : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो प्रेक्षकांना धमकी (Babar Azam threatens fans) देताना दिसतोय.

सौरभ तळेकर | Updated: Feb 24, 2024, 06:10 PM IST
Babar Azam : 'तू इकडं ये तुला दाखवतो...', Live सामन्यात बाबर आझमची दादागिरी; पाहा Video title=
PSL 2024, Babar Azam, Viral Video

PSL 2024, Babar Azam : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2024) खेळत आहे. बाबर आझमने (Babar Azam) दोन दिवसापूर्वी एक इतिहास रचला होता. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकून टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज बनला होता. अशातच आता कीर्तीमान मिळाल्यानंतर बाबर आझमच्या डोक्यात हवा गेल्याचं पहायला मिळतंय. सध्या सुरू असलेल्या पीएसएल सामन्यात बाबर आझमला संताप अनावर झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर बाबर चांगलाच ट्रोल होत आहे. 

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, बाबर आझम चाहत्यांवर संतापला आणि बाटलीतून पाणी फेकून मारण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे बाबर सध्या चांगलाच ट्रोल झाल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर बाबरवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे सामन्यात नेमकं काय झालं? पाहुया...

झालं असं की, पेशावर जाल्मी आणि मुल्तान सुल्तान यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी बाबर आझम नेहमीप्रमाणे डगआऊटमध्ये सहकाऱ्यांसोबत बसला होता. मात्र, पाकिस्तानमधील चाहत्यांनी बाबरला डिवचण्यास सुरूवात केली. 'झिम्बाबर' म्हणत चाहत्यांनी बाबर आझमला चिडवण्यास सुरूवात केली. सुरूवातीला बाबरने दुर्लक्ष केलं. मात्र, ग्राऊंडमधील प्रेक्षकांनी एकसुरात बाबरवर टीका करण्यास सुरूवात केली. मात्र, प्रेक्षकांचा हा त्रागा बाबरला आवडला नाही.

बाबरने प्रेक्षकांना धारेवर धरलं अन् थेट धमकी दिली. इकडं ये तुला दाखवतो, असं म्हणत बाबरने हातवारे केले अन् बॉटल फेकून मारण्याची धमकी दिली. मात्र, बाबरने बॉटल फेकून मारली नाही.  बाबरच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्याचा राग शमवण्याचा प्रयत्न केला. बाबरची ही कृती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. त्यानंतर सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Video पाहिलात का?

बाबरला झिम्बाबर म्हणून का चिडवतात?

गेल्या काही वर्षात बाबर आझमने धुंवाधार कामगिरी केली आहे. बाबर आझमची तुलना विराट कोहलीसोबत केली जाते. मात्र, मागील काही सामन्यात बाबर फ्लॉप ठरतोय. वर्ल्ड कप असो वा इतर महत्त्वाचे सामने, बाबरला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट चाहते त्याच्यावर नाराज असल्याचं दिसून येतं. मात्र, बाबरला पुन्हा फॉममध्ये येण्यासाठी झिम्बॉब्वे दौरा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातं. 

दरम्यान, बाबर आझमने झिम्बॉब्वेविरुद्ध 18 सामने खेळले आहेत आणि 57.75 च्या सरासरीने 693 धावा केल्या आहेत. बाबर लिंबू टिंबू संघाविरुद्ध चांगली कामगिरी करतो, त्यामुळे झिम्बाबर म्हणून बाबर आझमला डिवचण्यात येतं.