ODI WC 2023: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने सेमीफायनलचं गणित बिघडलं, पाक मारणार बाजी, असं आहे समीकरण!

ODI WC 2023: सध्याच्या पॉंईंट्स टेबलनुसारचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर सध्याचे टॉप 3 टीम सेमीफायनलमध्ये जाणार आहेत. परंतु सर्वात कठीण शर्यत शेवटच्या म्हणजेच चौथ्या स्थानासाठी असणार आहे. या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड यांची चढाओढ दिसून येणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 26, 2023, 11:03 AM IST
ODI WC 2023: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने सेमीफायनलचं गणित बिघडलं, पाक मारणार बाजी, असं आहे समीकरण! title=

ODI WC 2023: आयसीसी सर्व देशांमध्ये वर्ल्डकपचे वारे वाहतायत. प्रत्येक टीमला साखळी टप्प्यात नऊ सामने खेळायचे आहेत. आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार, सर्व दहा टीम्सने चार ते पाच सामने खेळले आहेत, म्हणजे जवळपास निम्मे सामने झाले असून सेमीफायनलची शर्यत आता रंगतदार होणार आहे. दहापैकी फक्त चार संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत, उर्वरित टीम्सचा प्रवास संपुष्टात येणार आहे. 

सध्याच्या पॉंईंट्स टेबलनुसारचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर सध्याचे टॉप 3 टीम सेमीफायनलमध्ये जाणार आहेत. परंतु सर्वात कठीण शर्यत शेवटच्या म्हणजेच चौथ्या स्थानासाठी असणार आहे. या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड यांची चढाओढ दिसून येणार आहे. 

ODI वर्ल्डकप 2023 मधील सध्याच्या पॉइंट्स टेबलनुसार, टीम इंडिया पाच पैकी पाच सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडची टीम आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलीये. तर सध्याच्या परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर नुकताच नेदरलँड्सचा मोठ्या फरकाने पराभव केलेली ऑस्ट्रेलियाची टीम आहे. 

दक्षिण आफ्रिका नेट रनरेटच्या जोरावर पुढे

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम्सचे 8-8 पॉईंट्स आहेत. नेट रनरेटच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका केवळ न्यूझीलंडच्या नाही तर भारतीय टीमच्याही पुढे आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी टीम पाचव्या क्रमांकावर असून दोन विजयानंतरही त्यांचंही नेट रनरेट मायनसमध्ये आहे. यामध्ये इंग्लंडची स्थिती सर्वात वाईट असून सध्या त्यांना चारपैकी फक्त एक सामना जिंकता आलाय. 

कधी मिळणार सेमीफायनलमध्ये एन्ट्री

टीम इंडियाने आतापर्यंत पाचपैकी पाच सामने जिंकले असून आता उर्वरित चार सामन्यांपैकी केवळ दोनच सामने जिंकणं आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेने पाचपैकी चार सामने जिंकले असून सेमीफायनल गाठण्यासाठी उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. न्यूझीलंडची स्थितीही अशीच आहे. संघाने पाचपैकी चार सामने जिंकले असून आता त्यांना उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकायचे आहेत. सेमीफायनल गाठण्यासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या टॉप 3 टीम्सचा नेट रनरेट चांगलं आहे, त्यामुळे त्यांना फारशी अडचण येणार नाही.

चौथ्या स्थानासाठी या टीम्समध्ये होणार संघर्ष

आता सर्वांना प्रश्न असा आहे की, चौथ्या जागेसाठी कोणत्या टीमची वर्णी लागणार? ऑस्ट्रेलियाचे सहा पॉईंट्स असून पाकिस्तानचे चार गुण आहेत. पाकिस्तानने पाच सामने खेळले असून उर्वरित चारपैकी प्रत्येक सामना जिंकल्यास पाकिस्तानचे 12 पॉईंट्स होतील. ऑस्ट्रेलियाने उर्वरित चार सामने जिंकल्यास त्यांचे 14 गुण होतील. 

इंग्लंडची अवस्था फार बिकट असून त्यांनी चार सामने खेळलेत तर त्यापैकी फक्त एकच सामना जिंकलाय. आता टीमला उर्वरित पाच सामने जिंकावे लागतील, तरच विजयांची संख्या सहा होणार आहे. मात्र हे काम खूप कठीण असणा आहे. यावेळी नेट रन रेट निर्णायक भूमिका बजावणार आहे. अशा स्थितीत इंग्लंडसाठी पुढील वाटचाल खूपच खडतर असणार आहे. अशात आता सेमीफायनल गाठण्यासाठी चौथी टीम कोणती असणार हे पहावं लागणार आहे.