IND VS NZ 1st Test : बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा युवा खेळाडू सरफराज खान याने त्याच्या टेस्ट करिअरमधील पहिलं शतक ठोकलं. टीम इंडिया संकटात असताना युवा क्रिकेटरने केलेल्या खेळीमुळे भारताला मोठी उभारी मिळाली. सरफराज खानच्या या शतकानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर याने पोस्ट करत त्याचे कौतुक केले.
16 ऑक्टोबरपासून बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून शनिवारी या सामन्याचा चौथा दिवस आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करून 402 धावा केल्या आणि 356 धावांची आघाडी घेतली होती. फलंदाजी करताना भारताने 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या तसेच दिवसाअंती न्यूझीलंड 125 धावांच्या आघाडीवर होती. तिसऱ्या दिवशी सरफराज खानने देखील 7 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 70 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी देखील सरफराज खानने हाच फॉर्म कायम ठेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणि टेस्ट क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं. काहीवेळाने पावसामुळे खेळ थांबण्यात आला तेव्हा सरफराज खानने नाबाद 125 धावा केल्या होत्या. सरफराजच्या या शतकानंतर ड्रेसिंग रूममध्ये मोठा जल्लोष करण्यात आला.
सरफराज खान हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सरफराज खानच्या शतकानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. सरफराज खान अनेक वर्ष टीम इंडियात खेळण्याची संधी मिळावी याची वाट पाहत होता. परंतु त्याला संधी मिळत नव्हती. अखेर 2024 च्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याचे भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. पदार्पणात त्याने दोन अर्धशतक ठोकली. आणि न्यूझीलंड विरुद्ध शतक ठोकून आपली प्रतिभा सिद्ध केली. सरफराज खान खूप संघर्षातून वर आलेला आहे. डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यात लिहिले होते की, 'रात को वक्त दो गुजरने के लिए, सुरज अपनेही समयपे निकलेगा'. यासह वॉर्नरने सरफराजचं अभिनंदन करून 'खूप मेहनत घेतलीस, वेल डन!' असं म्हटले.
David Warner&39; Instagram story for Sarfaraz Khan. pic.twitter.com/iIHjyfSHUd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2024
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके