India Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा 'ना पाक' प्रयत्न

अर्शदीपवर टीका करत भारतात धार्मिक वाद पेटवण्याचा प्रयत्न, पाकिस्तानचं कुटील कारस्थान  

Updated: Sep 5, 2022, 05:30 PM IST
India Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा 'ना पाक' प्रयत्न title=

Pakistan beat India Asia Cup T20 : एशिया कप स्पर्धेत आता Super-4 सामन्यांना सुरुवात झाली आहे. सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 5 विकेटने पराभव केला. पण या सामन्यानंतर सोशल मीडियावर फेक न्यूज चालवून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध खराब करण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरु करण्यात आले आहेत.  (Pakistan fans running propaganda fake news on social media)

काही पाकिस्तानी twitter अकाऊंटवरून खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. त्यामाध्यमातून शत्रूत्व वाढवण्याचा प्रयत्न केले जात आहे. परराष्ट्र प्रकरणांसारख्या विषयांवर लिहिणाऱ्या अंशुल सक्सेना (@AskAnshul) यांनी असा काही ट्विट्स शेअर केले आहेत. 

पाकिस्तानी फॅन्सचे वादग्रस्त ट्विट
अंशुल सक्सेना यांनी आपल्या ट्विटमघ्ये काही फेक पाकिस्तानी अकाऊंटचा स्क्रीन शॉट (Screen Shots) शेअर केले आहेत.  भारतीय मीडियातून अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) 'खलिस्तानी'  (khalistani) म्हटलं जात असल्याच्या खोट्या बातम्या या पाकिस्तानी ट्विटच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. या माध्यमातून भारतीयांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

यासारखीच खोटी ट्विट अनेक ट्विटर अकाऊंट्सवर शेअर करण्यात आलं आहे. भारतातल्या काही दिग्गज आणि पत्रकारांना यात टॅग करण्यात आलं आहे. 

अर्शदीप सिंह का होतोय ट्रोल
भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुपर 4 मधला सामना खेळला गेला. पहिली फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. विजयाचं हे आव्हान पाकिस्तानने 5 विकेट राखून पूर्ण केलं. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 26 धावा हव्या होत्या.

अठराव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर आसिफ अलीचा अगदी सोपा कॅच अर्शदीप सिंहच्या हातून सुटला. हाच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. आसिफ अलीने यानंतर धुवाँधार बॅटिंग करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पण अर्शदीप सिंहने सोडलेल्या त्या कॅचमुळे त्याला व्हिलन ठरवलं जात आहे. 

याआधी मोहम्मद शमीवर साधला जात होता निशाणा
खेळाआडून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सातत्याने केला जात असतो. 10 महिन्यांपूर्वी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताला हरवल्यानंतर सोशल मीडियावर अशाच वाईट कृत्याचा पर्दाफाश झाला होता. सोशल मीडियावर (Social Media) मोहम्मद शमीला (Mohammed Shami) भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरत त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्याच्यावर वाईट शब्दात टीका करत भारतीय संघातून हकलण्याची मागणीही करणयात आली होती. भारतीय नावं वापरून हे फेक अकाऊंट्स तयार करण्यात आले होते. तपासानंतर ही अकाऊंट्स पाकिस्तानमधून चालवली जात असल्याचं समोर आलं होतं.