Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने केला प्रेमाचा वर्षाव, 'दिल' वाला फोटो पाहिला आहे का?

Kohli ODI Century : Asia Cup मध्ये भारताने पाकिस्तानवर विराट विजय मिळवतं अनेक विक्रम केले आहेत. पण Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तुम्ही पाहिला का फोटो?

नेहा चौधरी | Updated: Sep 12, 2023, 09:00 AM IST
Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने केला प्रेमाचा वर्षाव, 'दिल' वाला फोटो पाहिला आहे का? title=
asia cup 2023 anushka sharma after virat kohli and k l rahulcentury against pakistan see instagram story

Anushka Sharma Reaction on Virat Kohli Century : आशिया चषक (Asia Cup 2023) मधील भारत पाकिस्तान सामन्यात (India vs Pakistan) भारतीय संघाने त्यांना निस्तनाभुत केलं. विराट कोहली आणि के एल राहुलच्या शतकी खेळीने पाकिस्तानला धुळ चारली. कोलंबोमध्ये पार पडलेल्या या सामन्यात किंग कोहलीची खेळी पाहून प्रत्येक भारतीयाची मान उंचावली. त्यात सर्वत्र विराट आणि कोहलीवर सोशल मीडियावरुन अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. अशातच कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा कशी मागे  (Anushaka Sharma on Virat Kohli) राहणार. (asia cup 2023 anushka sharma after virat kohli and k l rahulcentury against pakistan see instagram story)

विराट कोहलीने  77 वं आंतरराष्ट्रीय शतक तर केएल राहुलने सहावं एकदिवसीय शतक ठोकले आहे.  विराट या काळात अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याने कोलंबोमध्ये सलग चौथे शतक, तर एकदिवसीय कारकिर्दीत 47 वं शतक ठोकलं आहे. तुफानी खेळी खेळताना विराटने 9 फोर आणि 3 सिक्स लगावले. 

विराटच्या शतकानंतर अनुष्काने तिच्या अधिकृत इन्स्टा स्टोरीवर त्याचा अभिनंदनासाठी एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने लिहिलं आहे की, ''सुपर नॉक, सुपर guy''. 

एवढंच नाही तर तिने ए केल राहुलला अभिनंदन करताना त्याचा एक फोटो तिच्या इन्स्टा स्टेट्सवर शेअर केला आहे. 

विराटने तोडला सचिनचा रेकॉर्ड 

किंग कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड तोडला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी खेळात त्याने 13,000 रन्सची मजल मारली आहे. हा रिकॉर्ड करुन त्याने सचिन तेंडुलकरजचा  19 वर्ष जुना विक्रम मोडून काढला आहे.

या रिकॉर्डनंतर विराट जगातील पाचवा आणि भारतातील दुसरा बॅट्समॅन ठरला आहे.  

हेसुद्धा वाचा - रफ्तार....! चित्त्याच्या वेगानं धावतो विराट; वेग पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

सचिन तेंडुलकरने 16 मार्च 2004 मध्ये झालेल्या रावळपिंडीमधील पाकिस्तान सामन्याच्या वेळी हा विक्रम करत जगातील पहिला बॅट्समॅन ठरला होता. साठी सचिनने  330 सामन्यांच्या 321व्या डावात ही कामगिरी करुन दाखवली. तर विराटने 278व्या सामन्यातील 267व्या डावातच हा विक्रम केला आहे. याशिवाय सर्वात कमी डावात  8,000 रन्स, 9,000 रन्स, 10,000 रन्स, 11,000 रन्स आणि 12,000 रन्स करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर नोंद झाला आहे.