India vs Pakistan : टीम इंडियाने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग XI

हाय व्होल्टेज सामन्यात रोहित शर्मा ठरला टॉस का बॉस  

Updated: Aug 28, 2022, 07:18 PM IST
India vs Pakistan : टीम इंडियाने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग XI title=

दुबई : आशिया कपमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत रोहितने प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला बॅटींग करावी लागणार आहे. आता प्रथम बॅटींग करून पाकिस्तान किती धावसंख्या उभारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.    

रोहित शर्मान रिषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. आश्विनला संघात स्थान मिळालं नाही आहे. त्याच्याजागी अर्शदिपला संधी देण्यात आली आहे. 

टीम इंडियाने टॉस जिंकल्यावर बाबर आझम म्हणाला आहे की, आम्हाला आधी गोलंदाजी करायची होती पण ते आमच्या हातात नसल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच पाकिस्तान संघ तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. नसीम या सामन्यातून पदार्पण करणार आहे. 

आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) 14 वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. यावेळी भारतीय संघाचंच पारडं जड असल्याचं दिसून आलं आहे. भारताने पाकिस्तानला या 14 पैकी 8 सामन्यांत धुळ चारली आहे. तर पाकिस्तान देखील 5 सामने जिंकण्यात यशस्वी राहिला आहे. 

दरम्यान आशिया कपमध्ये पहिला सामना जिंकून टीम इंडिया विजयी श्री गणेशा करत की पाकिस्तान हा सामना जिंकून आपला दमखम दाखवतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

प्लेईंग इलेव्हन 

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा,दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी.