'ड्रग्ज माफिया IPL चा आनंद घेतायत'; आर्यन खान आणि अनन्या पांडे ट्रोल

आर्यन खान स्टँडवर बसून टीमला जोरदार चीअर करताना दिसला, तर सुहाना खानही कोलकात्यासाठी चीअर करत होती.

Updated: Apr 2, 2022, 10:13 AM IST
'ड्रग्ज माफिया IPL चा आनंद घेतायत'; आर्यन खान आणि अनन्या पांडे ट्रोल title=

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात काल वानखेडे स्टेडियममध्ये रंगला होता. यावेळी KKR मालक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, बहीण सुहाना तसंच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेसोबत सामना पाहण्यासाठी आले होता. आर्यन खान स्टँडवर बसून टीमला जोरदार चीअर करताना दिसला, तर सुहाना खानही कोलकात्यासाठी चीअर करत होती.

दरम्यान आर्यन खानसोबत अनन्या पांडेला पाहून युझर्सने सोशल मीडियावर त्या दोघांनाही ट्रोल केलं आहे. या दोघांना ट्रोल करत एका यूजरने लिहिलंय की, 'ड्रग गँग आज मैदानावर उपस्थित आहे.' तर अजून एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'दोन ड्रग माफिया आयपीएल एन्जॉय करतायत. त्यांनी ड्रग्ज घेतल्यासारखे त्यांचे भाव अजूनही दिसतात.

 

आणखी एका यूजरने लिहिलंय की, 'भाई आर्यन खान एवढी ड्रग्स कुठून पुरवतोय?' काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला होता ज्यामध्ये अनन्या पांडेचं नावंही समोर आले होतं.

आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. पंजाबने कोलकाताला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं होतं. कोलकाताने हे आव्हान 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आंद्रे रसेल कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला.