मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट राइडर्स विरूद्ध पंजाब किंग्ज एकमेकांविरूद्ध मैदानात उतरले होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. यावेळी केकेआरचा ओपनर अजिंक्य रहाणे फेल झाला आहे. मात्र एक मोठा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप झाला आहे. आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रहाणे केवळ 9 रन्स करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्याचवेळी कालच्या सामन्यात रहाणेही 12 रन्सवर करून बाद झाला. मात्र अवघे 12 रन्स बनवूनही त्याने मोठा विक्रम केला आहे.
पंजाब किंग्ज विरूद्धच्या इनिंगमध्ये रहाणेने आयपीएलमधील 4000 रन्स पूर्ण केले आहेत. हा आकडा गाठणारा तो भारताचा नववा आणि एकूण 12वा खेळाडू ठरलाय. सर्वात जलद 4000 रन्स करण्याच्या बाबतीत तो आठव्या क्रमांकावर पोहोचलाय. यासाठी त्याने 144 डाव खेळले असून रहाणेने रोहित शर्मा (147 डाव), रॉबिन उथप्पा (153 डाव) आणि एमएस धोनीला (157 डाव) मागे टाकलंय.
आयपीएलमध्ये सर्वात जलद 4000 रन्स करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ज्याने 112 डावांमध्ये हा विक्रम रचला आहे. विराट कोहलीने 128 डावात भारतासाठी सर्वात जलद 4000 रन्स पूर्ण केल होते.
आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेने आतापर्यंत 2 शतकं आणि 28 अर्धशतकांची खेळी केली आहे.