अर्जुन तेंडुलकर टी-२० मुंबई लीगमध्ये खेळणार

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे नाव टी-२० मुंबई लीगच्या लिलावमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 

Updated: Mar 17, 2019, 03:05 PM IST
अर्जुन तेंडुलकर टी-२० मुंबई लीगमध्ये खेळणार title=

मुंबई : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे नाव टी-२० मुंबई लीगच्या लिलावमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अर्जुनच्या समावेशामुळे मुंबई लीगच्या लिलावाकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये फरक केलेला आहे. याखेरीज सुब्रतो बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखालीही त्याने सराव केलेला आहे. अर्जुन हा १९ वर्षांचा असून डावखुरा मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. त्याने १९ वर्षांखालील गटात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुनने वयाच्या ८व्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरूवात केली. २२ जानेवारी २०१० साली अर्जुनने पुण्यात १३ वर्षांखालील गटात पहिला सामना खेळला होता. तेव्हापासून त्याने त्याचा प्रवास असाच कायम ठेवला. २४ जानेवारी २०१४ साली त्याने १४ वर्षाखालील मुंबईत खेळण्याची वय सीमा पूर्ण केली.