Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरसाठी (Arjun Tendulkar) मंगळवारचा दिवस फार खास होता. हैदराबादविरूद्ध शेवटची ओव्हर फेकताना अर्जुनने त्याच्या आयपीएल करियरमधील पहिली विकेट काढली आहे. मुळात कोलकाताविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने (Arjun Tendulkar) आयपीएलमध्ये डेब्यू केला. तर पुढच्या म्हणजेच हैदराबादच्या सामन्यात त्याला मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं.
कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात अर्जुनला केवळ 2 विकेट्स फेकण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्याने 2 ओव्हर्समध्ये 17 रन्स दिले. मात्र हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने 2.5 ओव्हर फेकत 18 रन्स दिले. यावेळी अर्जुनने भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली. तर ही विकेट पाहताच साराच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने भावासाठी खास पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केलीये.
पहिली विकेट मिळाल्यानंतर साराने अर्जुनसाठी एक खास पोस्ट शेअर केलीये. यावेळी सारा खूफ इमोशन झाल्याचं दिसून आलं. भुवनेश्वरती विकेट घेतल्यानंतर रोहित शर्माने धावत अर्जुनला मिठी मारली. हाच फोटो साराने शेअर केला आणि लिहिलंय, "हा माझा भाऊ आहे".
याशिवाय साराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अजून काही फोटो शेअर केलेत. याला कॅप्शन देताना सारा म्हणते, या दिवसाची दिर्घकाळापासून प्रतिक्षा होती.
गेल्या जवळपास 3 वर्षांपासून अर्जुन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. मात्र 2 सिझन त्याला संधी देण्यात आली नव्हती. अखेरीस यंदाच्या सिझनमध्ये अर्जुनचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध झालेल्या सामन्यात अर्जुनचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. या सामन्यात केवळ 2 ओव्हर्स टाकण्याची संधी अर्जुनचा मिळाली. मात्र हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने ओव्हर फेकून विकेट काढत टीमला विजय देखील मिळवून दिला.
पहिली विकेट घेतल्यानंतर अर्जुन म्हणाला, योजना आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे माझ्या हाती होतं, आणि यावर लक्ष केंद्रित करायचं होतं. मुळात मला गोलंदाजी करायला आवडते, कर्णधाराने मला केव्हाही गोलंदाजी करण्यास सांगितली की मी त्यासाठी तयार असतो. मी माझं सर्वोत्तम दिल्याने आनंदी आहे.