Arjun Tendulkar : मैदानाबाहेर अर्जुन आणि नेहल वढेरामध्ये जुंपली; व्हिडीओ होतोय व्हायरल

Arjun Tendulkar : हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा समावेश केला जाणार का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशातच अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे.  

Updated: May 20, 2023, 05:55 PM IST
Arjun Tendulkar : मैदानाबाहेर अर्जुन आणि नेहल वढेरामध्ये जुंपली; व्हिडीओ होतोय व्हायरल title=

Arjun Tendulkar : आयपीएलचा 16 वा सिझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. रविवारी प्लेऑफचं गणित पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) प्लेऑफ गाठणार का हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. याशिवाय आगामी मुंबई इंडियन्सच्या सामन्यांमध्ये अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) टीममध्ये समावेश होणार का, असा प्रश्नही उपस्थित होतोय. मात्र अशातच अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे.  

अर्जुनचा व्हिडीओ होतो व्हायरल 

यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाताविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) डेब्यू केलं. मुंबईने ( Mumbai Indians ) त्याला 4 सामने खेळण्याची संधीही दिली, मात्र त्यानंतर त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दरम्यान अर्जुन प्रत्येक सामन्यापूर्वी नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना दिसतो. अशातच अर्जुन आता पंजा लढवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( Social Media Viral ) झाला आहे. 

मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अर्जुन तेंडुलकर पंजा लढवताना दिसतोय. मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) फलंदाज नेहल वढेरासोबत अर्जुनने पंजा लढवला आहे. दरम्यान पंजा लढवताना अर्जुन ( Arjun Tendulkar ) पराभवाच्या जवळ दिसून आला होता. यावरून अर्जुन वढेरासोबत पंजा हरला असावा असा अंदाज लावण्यात येतोय. चाहत्यांना हा व्हिडीओ फार आवडला आहे.  

अर्जुन तेंडुलकर करणार कमबॅक?

अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलमध्ये डेब्यू केला. यावेळी तो मुंबई इंडियन्सकडून 4 सामने खेळला. या 4 सामन्यांमध्ये अर्जुनने 3 विकेट्स देखील पटकावल्या. मात्र पंजाबविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने ( Arjun Tendulkar ) एका ओव्हरमध्ये तब्बल 31 रन्स खर्च केले. दरम्यान त्याच्या या कामगिरीनंतर रोहित शर्माने इतर युवा खेळाडूंना संधी दिली. 

याशिवाय गुजरातविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने फलंदाजी देखील केली. अर्जुनने 9 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी केली. या खेळीत त्याने एक सिक्सही लगावला. येत्या रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे, या सामन्यात अर्जुनचं कमबॅक होणार का, हे पहावं लागणार आहे.