Arjun Tendulkar Century: "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला

Arjun Tendulkar Century: रणजी ट्रॉफीच्या पदार्णाच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शतकी खेळी केली. यावर बहिण सारा आणि कोच योगराज सिंग यांच्यानंतर आता वडील सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया आली आहे.

Updated: Dec 16, 2022, 12:29 PM IST
Arjun Tendulkar Century: "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला  title=

Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेतून धमाकेदार पदार्पण केले. गोवा संघाकडून खेळताना 23 वर्षीय अर्जुनने राजस्थानविरुद्ध 120 धावा केल्या. आपल्या पहिल्या सामन्यात त्याने शतकी खेळी साकारली. क्रिकेट वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. कारण अर्जुनच्या शतकामुळे जुन्या खास आठवणीला उजाळा मिळाला आहे. यावर क्रिकेट जगतात अर्जुनच्या नावाचा गाजावाजा सुरु असताना आता क्रिकेटचा देव अशी उपमा मिळालेल्या सचिन तेंडुलकरने (sachin tendulkar ) लेकाच्या शतकावर खास प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुनचे वडील आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) ने 1988 साली रणजीत पदार्पण केले होते.सचिनने देखील पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाज असलेल्या सचिनने एका कार्यक्रमात अर्जुनच्या शतकावर प्रतिक्रिया दिली. चांगले झाले तुम्ही हा प्रश्न विचारलात. मला आठवते की, मी माझ्या वडिलांना कोणी तरी सांगता ऐकले होते की, त्यांना कोणी तरी सचिनचे वडील म्हणून हाक मारली होती. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी भारताकडून खेळण्यास सुरुवात केली होती.

त्यांनी (वडिलांनी) ही गोष्टी ऐकली आणि माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांना विचारले की तुम्हाला आता कसे वाटते? त्यावर वडील म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील सर्वात गौरवपूर्ण क्षण आहे. प्रत्येक वडिलांची इच्छा असते की मुलांच्या कामगिरीवर त्यांची ओळख व्हावी.

अर्जुनवर दबाव

सचिन तेंडुलकरने ही गोष्ट देखील मान्य केली की माझा मुलगा असल्याने अर्जुनवर अतिरिक्त दबाव असतो. जेव्हा सचिन क्रिकेट खेळत होता तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. त्याच बरोबर मॅचच्या एक दिवस आधी अर्जुन सोबत सचिनचे बोलण आले. तेव्हा अर्जुन नाबाद खेळत होता.

मी त्याला शतक पूर्ण करण्यास सांगितले. तो 4 धावांवर नाबाद खेळत होता. त्याला नाइटवॉचमन म्हणून पाठवले होते. तुम्हाला काय वाटते चांगली धावसंख्या किती असेल? तेव्हा गोव्याने 5 बाद 210 धावा केल्या होत्या. सचिनने किमान 375 पर्यंत धावा कराव्या लागतील असे उत्तर दिले. त्यावर सचिनने अर्जुनला हे देखील सांगितले की, विश्वास ठेव तु शतक करू शकतोस. 

तेंडुलकर पुढे म्हणाला की, अर्जुन तेंडुलकरचे लहानपण सामान्य नव्हते. क्रिकेटरचा मुलगा असल्यामुळे त्याच्यासाठी सर्व गोष्टी कठिणच होत्या. ज्यावेळी मी निवृत्ती घेतली त्यावेळी मी सर्व मीडियाला हाच संदेश दिला होता, की त्याला क्रिकेटवर प्रेम करु द्या. त्याला संधी द्या. माझ्यावर आई वडिलांनी कोणतेही दडपण टाकले नव्हते. अगदी मी देखील त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा दबाव टाकत नाही. प्रोत्साहन आणि समर्थन या गोष्टीसह त्याला पुढे आव्हाने आहेत, याची जाणीव करुन देतो. असेही तेंडुलकरने सांगितले.