Arjun Tendulkar : 16 वी ओव्हर अर्जुनला का दिली? अखेर कोच मार्क बाऊचर यांनी दिलं स्पष्टीकरण

अर्जुनने शनिवारी त्याच्या होम ग्राऊंडवर पहिली विकेट घेतली. मात्र त्याच्या या विकेटचा आनंद काही काळच टिकला. 16 व्या ओव्हरमध्ये पंजाबच्या फलंदाजांनी तब्बल अर्जुनला 31 रन्स चोपले. अर्जुनची 16 वी ओव्हर ही 6, Wd, 4, 1, 4, 6, N4, 4 अशी होती. 

Updated: Apr 23, 2023, 06:00 PM IST
Arjun Tendulkar : 16 वी ओव्हर अर्जुनला का दिली? अखेर कोच मार्क बाऊचर यांनी दिलं स्पष्टीकरण title=

Arjun Tendulkar : मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) शनिवारी पंजाब किंग्जने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला. 215 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना मुंबईने चांगली फलंदाजी केली. यावेळी काही रन्स जर कमी असते तर मुंबईचा विजय नक्कीच झाला असता. मुंबईची टीम गोलंदाजी करत असताना 15 व्या ओव्हरपर्यंत सर्व गोष्टी नियंत्रणात होता, मात्र अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) 16 व्या ओव्हरनंतर संपूर्ण खेळ बिघडला. अर्जुनच्या याच ओव्हरवर अखेर मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी वक्तव्य केलंय.

अर्जुनने शनिवारी त्याच्या होम ग्राऊंडवर पहिली विकेट घेतली. मात्र त्याच्या या विकेटचा आनंद काही काळच टिकला. 16 व्या ओव्हरमध्ये पंजाबच्या फलंदाजांनी तब्बल अर्जुनला 31 रन्स चोपले. अर्जुनची 16 वी ओव्हर ही 6, Wd, 4, 1, 4, 6, N4, 4 अशी होती. आणि या ओव्हरनंतर सामन्याचा संपूर्ण खेळ बदलला.

पंजाबने मुंबईचा 13 रन्सने पराभव केला. दरम्यान सामन्यानंतर मुंबई इंडियन्सनचे मुख्य कोच मार्क बाऊचर यांनी अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीबाबत मोठं विधान केलं आहे.  बाऊचर यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने त्यावेळी मॅचअपमुळे निर्णय घेतला असावा. 

मार्क बाऊचर म्हणाले, माझ्या मताप्रमाणे हा सामना एकदम बरोबरीचा होता. फलंदाजीच्या वेळी सूर्यकुमारची विकेट फार मोठी होती. सूर्याने मारलेला तो शॉट जर आणखीन उंच गेला असता, तर तो सिक्स गेला असता. सूर्याने या सामन्यात उत्तम फलंदाजी केली. मात्र पंजाबच्या टीमला इतका मोठा स्कोर उभारायला देणं हे फार निराशाजनक होतं. आम्ही गोलंदाजीमुळे सामना गमावला. 

अर्जुनच्या गोलंदाजीविषयी काय म्हणाले बाऊचर?

हेड कोच यांच्या म्हणण्यानुसार, पंजाब फलंदाजी करत असताना 15 व्या ओव्हरपर्यंत सर्व गोष्टी नियंत्रणात होता. त्यानंत 16 वी ओव्हर अर्जुनला देण्यात आली. शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये आम्ही भरपूर रन्स दिले. आणि हीच गोष्ट फार निराशाजनक होती. 

अर्जुनने 16 व्या ओव्हरमध्ये एकूण 31 रन्स खर्च केले. त्याने या सामन्यात 3 ओव्हर्समध्ये 48 रन्स दिले. मुळात रोहित शर्मा खूप अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे रोहितला वाटलं असावं की, 14-15 वी ओव्हर तो फेकू शकतो. काही वेळा गोष्टी तुमच्या बाजूने असतात. मात्र काही वेळा त्या उलट होतात. मुळात टी-20 क्रिकेटमध्ये असं होऊ शकतं, असं मार्क बाऊचर यांनी म्हटलंय.