मुंबई : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत देशाचं नाव उंचावलं आहे. यामध्ये भारताला 11वं मेडलं मिळालं आहे. पुरुषांच्या हाय जंपमध्ये प्रवीण कुमारने सिल्वर मेडल पटकावलं आहे. हाय जंपमध्ये (T64) प्रवीण ने 2.07 मीटरची उडी मारत सिल्वर मेडलला गवसणी घातली आहे. या उंड उडीसह प्रवीणने एक नवीन आशियाई विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
प्रवीण संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र शेवटच्या क्षणात पोलंडचा खेळाडू जोनाथनने त्याला मात दिली. 2.10 मीटर उडी घेऊन जोनाथनने गोल्ड मेडल जिंकलं. प्रवीणच्या या सिल्वर मेडलमुळे पॅरालिम्पिकमधील भारताच्या खात्याय आता 11 मेडल आहेत.
पॅरालिम्पिकमधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. बऱ्याच वर्षांनंतर देशाच्या पदकांची संख्या दोन अंकी झाली आहे. टोक्यो क्रीडा स्पर्धेच्या उंच उडीत भारताला 4 पदकं मिळाली. यापूर्वी भारताच्या मरिअप्पन थंगावेलूने उंच उडी टी 63 स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावलं, तर शरद कुमारला कांस्यपदक मिळालं. निषाद कुमारने T47 मध्ये आशियाई विक्रमासह सिल्वर मेडल जिंकलं.
प्रवीण कुमार यांच्या याच्या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हणाले, "पॅरालिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकल्याबद्दल प्रवीण तुझा अभिमान आहे. हे मेडल त्याच्या मेहनतीचं आणि समर्पणाचं फळ आहे. तुला भविष्यासाठी शुभेच्छा."
भारताने आतापर्यंत टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 2 गोल्ड, 6 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ अशी 11 मेडल जिंकली आहेत.