मुंबई : स्वतःचे आणि हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. ती त्याची गरज असते. मानवी जीवनातील अन्न-वस्त्र-निवारा या तीन मूलभूत गरजांमधील आजकालची ही महत्त्वाची गरज मानली जाते. मात्र, कमी वयात आलिशान घर बांधले असेल तर त्याची चर्चा तर होणारच. टीम इंडियाचा (Team India) आघाडीचा खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याने आपल्या वयाच्या 23 वर्षी अशी कमाल करुन दाखवली आहे.
टीम इंडियाचा यष्टीरक्षक (Team India wicketkeeper) आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. हा 23 वर्षीय यष्टीरक्षक, फलंदाज भारतीय क्रिकेट संघाचा उगवता तारा आहे. जेव्हा पंत मैदानावर नसतो, तेव्हा तो आपला बहुतेक वेळ आपल्या कुटुंबासोबत घरी घालवतो. चला, ऋषभ पंतच्या आलिशान घराची माहिती घेऊ या.
युवा खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या घरात एक आलिशान बेडरूम आहे. या बेडरूममध्ये भौमितिक, मोनोक्रोम लेआउट आहे.
ऋषभ पंत याच्या घराच्या खोल्यांमध्ये भरपूर जागा आहे आणि लाकडी काम करण्यात आले आहे. खोल्यांची रचना अतिशय आधुनिक असून भिंतीवर चित्रे आहेत.
ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या घरात एक आलिशान जेवणाचे खोलीही आहे. याशिवाय तो त्याच्या फिटनेसकडेही खूप लक्ष देतो. अशा परिस्थितीत ऋषभ पंत याने घरात एक छोटी जिमही बांधली आहे.
ऋषभ पंत (Rishabh Pant)याच्याकडे खूप महागडी मर्सिडीज (Mercedes) आहे, जी त्याच्या पार्किंगची शान वाढवत आहे.