Virat Kohli : निर्णय चुकला, विकेट पडली...; रागाने लालबूंद झालेला विराट छोले भटुरे पाहून क्षणार्धात झाला कूल

 कोहलीने अनेकदा त्याच्या इंटरव्यूमध्ये सांगितलं आहे की, त्याला दिल्लीचे छोले भटुरे फार आवडतात. अनेकदा डाएट किंवा क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने त्याला दिल्लीचे छोले भटुरे खाता येत नाहीत. 

Updated: Feb 18, 2023, 06:18 PM IST
Virat Kohli : निर्णय चुकला, विकेट पडली...; रागाने लालबूंद झालेला विराट छोले भटुरे पाहून क्षणार्धात झाला कूल title=

Virat Kohli : जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमींना माहिती असेल की, टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली (virat Kohli) ला छोले भटुरे (Chole bhature) किती आवडतात, आणि ते ही दिल्लीचे. कोहलीने अनेकदा त्याच्या इंटरव्यूमध्ये सांगितलं आहे की, त्याला दिल्लीचे छोले भटुरे फार आवडतात. अनेकदा डाएट किंवा क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने त्याला दिल्लीचे छोले भटुरे खाता येत नाहीत. मात्र नुकतंच आजच्या सामन्यात फलंदाजीनंतर विराटने त्याच्या आवडीचे छोले-भटुरे खाल्ले आहेत. मुख्य म्हणजे, यावेळी काहीसा संतापलेला विराट शांत देखील झालाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

छोले भटुरे पाहतात खूश झाला विराट

आजच्या सामन्यामध्ये विराटच्या विकेटवरून वाद झालेला दिसून आला. दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याच्या आरोप या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याप्रकरणी विराट चांगलाच संतापला होता. यावेळी डगआऊटमध्ये येऊन देखील तो कोच राहुल द्रविड यांना त्याच्या विकटेबद्दल सांगत होता, याचवेळी मागून एक व्यक्ती कोहलीला खाण्यासाठी पदार्थ घेऊन येते.

खाण्याचे पदार्थ पाहताच कोहली अगदी एका लहान बाळासारखा खूश होताना दिसतोय. दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओनुसार, विराट कोहलीसाठी आणलेला हा खाण्याचा पदार्थ छोले भटुरे होते. हे छोले भटुरे पाहून विराट इतका खुश झाला की, त्याला पाहून कोच राहुल द्रविड देखील हसू रोखू शकला नाही. 

Virat Kohli च्या विकेटवरून वाद

थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाच्या पहिल्या डावात ही घटना घडली. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका बॉलवर पहिल्या मैदानी अंपयारने एलबीडब्ल्यू आऊट दिलं. यावेळी विराटने (Virat Kohli) रिव्ह्यू घेतला. त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) यांनी त्याला आऊट घोषित केलं. रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे.

डगआऊटमध्ये येऊन कोच राहुल द्रविड यांच्याशी केली चर्चा

आऊट करार दिल्यानंतर रागाच्या भरात विराट कोहली डग आऊटमध्ये पोहोचला. डग आऊटमध्ये परतल्यानंतर तो थेट कोट राहुल द्रविड यांच्याकडे गेला. यावेळी कोहली कोच राहुल द्रविड यांना, तो आऊट नसल्याचं सांगत असताना दिसतंय. दरम्यान कोहलीला ज्या पद्धतीने आऊट दिलं, ते पाहून राहुल द्रविड देखील नाखूश असल्याचं दिसून आलं.