Arjun Tendulkar: आयपीएल 2023 चा 16 वा सिझन 31 मार्चपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी यंदाच्या आयपीएलचं शेड्यूल देखील जाहीर केलं. यावर्षीच्या आयपीएलमध्ये काही खास होणार आहे. अशातच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) साठी देखील मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. यंदा झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे येत्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघामध्ये त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या 2 सिझनपासून चाहते अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला खेळवण्याची मागणी करण्याच येतेय. गेल्या 2 सिझनपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेल्या Mumbai Indians अर्जुन हिस्सा आहे. मात्र त्याला अजूनही डेब्यूची संधी मिळालेली नाही.
आयपीएल 2022 मध्ये मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला 30 लाखांमध्ये आपल्या ताफ्यात सहभागी केलं होतं. मात्र यावेळी अर्जुनला एकंही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही. मात्र आता रणजी ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
लेफ्ट आर्म पेसर आणि डावा हाताचा फलंजाद अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये डेब्यूची प्रतिक्षा करतोय. मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये त्याचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. मात्र यंदाची रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये गोव्याकडून अर्जुनने डेब्यू सामन्यात शतक ठोकलं होतं.
राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 207 बॉल्समध्ये सामना करत 120 रन्स करत शतक झळकावलं होतं. या इनिंगमध्ये अर्जुन तेंडुलकरच्या 16 फोर आणि 2 सिक्स ठोकले होते. या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा अर्जनला डेब्यू करण्याची संधी देऊ शकतो.
अर्जुन तेंडुलकरने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत 7 प्रथम श्रेणी सामने, 7 लिस्ट ए सामने आणि 9 टी-20 सामने खेळलेत. अर्जुनने प्रथम श्रेणी सामन्यात 104 रन्स आणि 3 विकेट्स, लिस्ट ए मध्ये 259 र्सन आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय त्याने T20 मध्ये 180 रन्स आणि 12 विकेट्स घेतल्या आहेत. रणजी ट्रॉफीशिवाय अर्जुन तेंडुलकरने यावेळी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केलीये. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे अर्जुनचा समावेश प्लेईंग-11 मध्ये होण्याची शक्यता आहे.