वन डे आणि कसोटी सामन्यांची लीग सुरू करणार- आयसीसी

आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लीगला हिरवा कंदील दिला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 13, 2017, 12:01 PM IST
 वन डे आणि कसोटी सामन्यांची लीग सुरू करणार- आयसीसी title=

नवी दिल्ली : क्रिकेटला अधिक चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी चॅम्पियनशिप व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लीगला हिरवा कंदील दिला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी बैठकीनंतर आयसीसीच्या नियमन मंडळाच्या बैठकीची माहिती दिली. द्विपक्षीय मालिका अधिक मनोरंजक बनविण्यासाठी या सूचना दीर्घकाळ चालू होत्या. आजच्या बैठकीनंतर आयसीसीने यासंदर्भात निर्णय घेतला.

या नव्या निर्णयानंतर आयसीसीच्या ९ संघांनी आता या टेस्ट सीरीज़ लीगमध्ये सहभाग घेतला असून प्रत्येक संघाला २ वर्षात ६ सीरिज खेळाव्या लागणार आहेत. या ६ मालिकेतील मालिका घरच्या मैदानात आणि ३ मालिका बाहेर खेळाव्या लागणार आहेत. या खेळातूनच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र खेळाडू ठरविले जाणार आहेत.

अशा प्रकारे वर्ल्ड कपमध्ये आयसीसीच्या १२ पूर्ण सदस्यांच्या टीम आणि आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपचा विजेते संघ सहभागी होणार आहेत.