Ajinkya Rahane : नुकतंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (ICC World Test Championship) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यासाठी मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) निवड टीम इंडियामध्ये करण्यात आलीये. तब्बल 15 महिन्यांनंतर अजिंक्यचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलाय. टीम इंडियामध्ये कमबॅक (Ajinkya Rahane comeback) केल्यानंतर अजिंक्यने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रहाणे भावूक (Ajinkya Rahane Emotional) झाल्याचं दिसून आलं.
सोशल प्लॅटफॉर्मवर लिहीताना अजिंक्य म्हणतो, एक प्रोफेशनल लाईफचा हा प्रवास सोपा नाही. यावेळी असे काही क्षण येतात जेव्हा गोष्टी योजनेनुसार होत नाहीत. मात्र यावेळी मी शिकलो की, याबाबत म्हणजेच प्रक्रियेशी टिकून राहणं खूप महत्वाचं असतं. जेव्हा मी माझ्या कारकिर्दीकडे वळून पाहतो, त्यावेळी मला जाणवतं की, टिकून राहिल्याने माझा फायदा झाला.
अजिंक्य पुढे म्हणतो, माझ्या हे देखील लक्षात आलं की, ज्यावेळी मी रिझल्ट शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते योग्य नव्हते. तो माझा सर्वात वाईट काळ होता. हे केवळ क्रिकेटमध्ये लागू होत नाही तर प्रक्येक फिल्डमध्ये प्रक्रियेशी चिटकून राहणं तुम्हाला फायदेशीर ठरतं. ज्यावेळी आपण एखादी प्रोसेस फॉलो करतो, तेव्हा लक्ष्य पूर्ण करण्यास आपल्याला मदत मिळते. एक गोष्ट नक्की की, मी स्वतःवर कधी प्रेशर आणलं नाही.
सध्या अजिंक्य रहाणे उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतोय. यामुळेच टीम इंडियाचे प्रमुख कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी अजिंक्यला टीममध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. द टेलीग्राफमध्ये दिलेल्या बातमीनुसार, अजिंक्य रहाणेचा टीम इंडियामध्ये समावेश होण्यासाठी रोहित आणि द्रविड यांनी प्रयत्न केले. मंगळवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच्या फायनलसाठीच्या टीमची घोषणा करण्यात आली. यामध्ये अजिंक्यच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.
सध्या आयपीएल सुरु असून रहाणे उत्तम फॉर्ममध्ये आहे. अजिंक्य चेन्नई सुपर किंग्जच्या टीममधून खेळत असून त्याने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 52.25 च्या सरारीने एकूण 209 रन्स केलेत. केकेआरविरूद्धच्या सामन्यात अजिंक्यने कमाल फलंदाजी केली. त्याने 29 बॉल्समध्ये तब्बल 71 रन्सची खेळी केली. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 2 अर्धशतकं झळकावली आहेत.