NZ vs AFG : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर किवी कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'

Tom Latham : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने मोठं वक्तव्य केलंय. सलग चार विजयानंतर 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'

Updated: Oct 18, 2023, 11:27 PM IST
NZ vs AFG : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर किवी कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...' title=
After defeating Afghanistan new zealand Kiwi captain Tom Latham said Now eyes on India and Australia World Cup

Tom Latham Statement : विश्वचषकात (World Cup 2023) बुधवारी झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात किवीचा विजय झाला आहे. कर्णधार टॉम लॅथमच्या नेतृत्त्वात हा किवीचा सलग चौथा विजय आहे. न्यूझीलंडने फलंदाजी घेऊन 288 धावांचं लक्ष अफगाणिस्तानसमोर ठेवलं होतं. मात्र किवीच्या खेळाडूंनी अफगाणिस्तानला 139 धावांत गुंडाळलं. विश्वचषकातील आतापर्यंतच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर हा किवी संघाचा दुसरा सर्वात मोठा विजय म्हणता येईल. या विजयानंतर किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथमने मोठं वक्तव्य केलं आहे. (After defeating Afghanistan new zealand Kiwi captain Tom Latham said Now eyes on India and Australia World Cup ) गुरुवारी भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामना होणार आहे. टॉमने भारताचा उल्लेख करत विधान केलं आहे. 

काय म्हणाला टॉम लॅथम?

खरं तर केन विल्यमनसनच्या दुखापतीमुळे संघाचं नेतृत्त्व हे लॅथमकडे आलं आहे. त्याने ही जबाबदारी उत्तमपणे निभवत असल्याचं बुधवारच्या मॅचमध्ये दाखवून दिलं. सामन्यातील विजयानंतर तो म्हणाला की, चांगल्या कामगिरीने आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. आमच्याकडे एक आठवड्याचा वेळ आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे. विजयाचा हा ट्रेंड कायम राहील अशी आमची अपेक्षा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचाही पराभव करु असं त्यांने म्हटलं आहे. 

किवीच्या टॉम लाथमने 76 बॉलमध्ये 68 रन काढले तर ग्लेन फिलिप्सने 80 बॉलमध्ये 71 रन बनवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 144 ची भागीदारी केली.  न्यूझीलंडने 6 विकेट गमावल्यानंतर 288 रनचं आव्हान अफगाणिस्तान समोर ठेवलं. मात्र अफगाणिस्तान 34.4 षटकात फक्त 139 धावा केल्यात. मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी 3 तर ट्रेंट बोल्टने 2 विकेट घेतले.