पाक दिग्गजाच्या मुलाला मायदेशाकडून नाही तर या टीमकडून खेळायचंय

उस्मानपूर्वी 2013 मध्ये फवाद अहमदनंही ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारत क्रिकेट खेळणं सुरू केलं होतं.

Updated: Sep 27, 2018, 12:58 PM IST
पाक दिग्गजाच्या मुलाला मायदेशाकडून नाही तर या टीमकडून खेळायचंय  title=

मेलबर्न : पाकिस्तानचा प्रसिद्ध बॉलर अब्दुल कादिर याचा मुलगा उस्मान कादिर याला मायदेशाकडून नाही तर ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचंय... यासाठी त्यानं एक पाऊल पुढेही टाकलंय. उस्माननं बुधवारी वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत पदार्पण केलं आणि जंक्शन ओवल मैदानावर खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये विक्टोरियाविरुद्ध 50 रन्स देत तीन विकेटही आपल्या नावावर केल्यात. 

फवाद अहमदसाठी बदलले नियम

उस्मानला अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. 'फवादसाठी सरकारनं नियम बदलल्याचं माझ्या लक्षात आलं तेव्हा मीदेखील व्हीजासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यापूर्वीच मला इथं स्थायी रुपात राहण्याची परवानगी मिळाली होती. येत्या दोन वर्षांत मला इथलं नागरिकत्व मिळेल, अशी आशा आहे' असं उस्माननं एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं. उस्मानपूर्वी 2013 मध्ये फवाद अहमदनंही ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारत क्रिकेट खेळणं सुरू केलं होतं.

...तेव्हाच संधी मिळणार होती

उस्मानला ऑस्ट्रेलियाकडून 2020 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याची इच्छा आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासाचं सर्व श्रेय उस्मान ऑस्ट्रेलियाचे माजी कोच डॅरेन बेरी यांना देतो. उस्माननं पाकिस्तानी टीमकडून 2012 अंडर - 19 वर्ल्डकपमध्ये सहभाग घेतला होता. यावेळही त्याला ऑस्ट्रलियाचं नागरिकत्व ऑफर करण्यात आलं होतं. तेव्हाच बेरी यांनी 'तुला पुढच्या वर्षीपर्यंत नागरिकत्व मिळू शकेल आणि करारही' असंही सांगितलं होतं... परंतु, वडिलांनी मात्र 'तुला परत येऊन पाकिस्तानकडून खेळलं पाहिजे' असा आग्रह धरला होता. त्यावेळी मी लहान होतो... त्यामुळे मी पाकिस्तानात परतलो...' असं उस्माननं म्हटलंय. 

पाकिस्तानात उपेक्षा

परंतु, पाकिस्तानात परल्यानंतर दीर्घकाळापासून पाकिस्तानी निवड समितीकडून उस्मानच्या हाती केवळ उपेक्षाच लागली... त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच 24 वर्षीय उस्माननं ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा निर्णय मनाशी पक्का केला होता. यासाठी तो खूप मेहनतही घेतोय.