मुंबई : 83 सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा 1983 वर्ल्ड कपचे किस्से ताजे झाले. त्यावेळी घडलेले प्रसंग आणि आठवणी या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा ताज्या झाल्या. असाच एक किस्सा आहे. ज्यामध्ये टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवूनही उपशीपोटी झोपण्याची वेळ आली होती.
1983 मध्ये एक वेळ अशी होती की अनेक दिग्गजांना असं वाटलं होतं की टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकू शकणार नाही. मात्र टीम इंडियाला कमीपणाचं लेखणं हे चुकीचं ठरलं. टीम इंडियाची सुरुवात चांगली नसली तर क्रिकेटपटूंनी बाजी पलटवून दाखवली.
आपल्या शब्दातून नाही तर कामगिरीनं संपूर्ण जगाला क्रिकेटपटून हे दाखवून दिलं. 1983 चा वर्ल्ड कप जिंकवून संपूर्ण जगाला टीम इंडिया काय करू शकते हे कृतीतून दाखवून दिलं आहे. कपिल देव यांनी त्यावेळी घडलेला एक किस्सा सांगितला जो भावुक करणारा आहे.
1983 रोजी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने वेस्टइंडिजचा पराभव करून वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी एकीकडे जिंकण्याचा अपार आनंद होता. तर दुसरीकडे क्रिकेटपटू उपाशी असल्याने खूप भुकही लागली होती.
वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद एवढा मोठा होता की त्यापुढे टीम इंडियाचे खेळाडू भुकही विसरले. सगळेजण त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत विजयाचा आनंद साजरा करत होते.
पार्टी उशिरापर्यंत सुरू राहिली जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा आपल्याला भुक लागली असल्याची जाणीव झाली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या दिवशी सर्व क्रिकेटपटू उपाशीपोटी झोपले. त्या दिवशी कोणीच तक्रार केली नाही कारण या आनंदानं सर्वांनी आपलं पोट भरलं आणि झोपी गेले असा किस्सा कपील देव यांनी एक मुलाखती दरम्यान सांगितला होता.