बाबो..! 'हा' देश वर्ल्डकपसाठी पाठवतोय 10 बॉलर्स असलेला संघ; 8 Oct ला भारताविरुद्ध सामना

This Country Announce 10 Bowler Team For 2023 World Cup: विश्वचषक 2023 साठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2023 असल्याने अनेक देशांनी काल आपल्या संघांची घोषणा केली. ज्यात भारताचाही समावेश आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 6, 2023, 12:16 PM IST
बाबो..! 'हा' देश वर्ल्डकपसाठी पाठवतोय 10 बॉलर्स असलेला संघ; 8 Oct ला भारताविरुद्ध सामना title=
टीम इंडिया या संघाविरुद्ध सामना खेळणार आहे

This Country Announce 10 Bowler Team For 2023 World Cup: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपसाठी संघांची घोषणा करण्याची अंतिम तारखी 5 सप्टेंबर होती. त्यामुळेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी मंगळवारी आपल्या संघांची घोषणा केली. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्याच्या 5 तारखेपासून भारतामध्ये खेळवली जाणार आहे. कालच भारताबरोबर दक्षिण आफ्रिकेनेही आपली 15 सदस्यांची टीम जाहीर केली आहे. दुसरीकडे इंग्लंडने आपल्या अव्वल 18 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ही प्राथमिक यादी असली तरी यामधूनच अंतिम संघ निवडला जाणार आहे. दरम्यान मंगळवारीच एका विश्वविजेत्या देशाने आपल्या संघाची घोषणा केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संघामध्ये तब्बल 10 गोलंदाज आहेत.

कर्णधारही वेगवान गोलंदाजच

भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेसाठी 10 गोलंदाजांचा पर्याय असलेला संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने मंगळवारी या स्पर्धेसाठी आपल्या 15 खेळाडूंची यादी जाहीर केली. मागील महिन्याच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेसाठी 18 खेळाडूंच्या प्राथमिक यादीची घोषणा केली होती. या 18 खेळाडूंमधूनच 15 खेळाडूंची अंतिम यादी आयसीसीला देण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व वेगवान गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सकडेच देण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 8 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध खेळणार आहे. 

संघात कोणकोण आहे?

ऑस्ट्रेलियाच्या 18 सदस्यीय संघामध्ये एकूण 4 वेगवान, 3 मध्यम गती अष्टपैलू खेळाडू, एक फिरकी अष्टपैलू खेळाडू आणि 2 फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियन संघाकडे 2023 च्या वर्ल्डकपमध्ये गोलंदाजीचे 10 पर्याय मिळणार आहेत. या संघामध्ये 5 फलंदाज आहेत. वेगवान गोलंदाज आणि संघाचा कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क आणि सीन एबॉट यांचा संघात समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये मिचेल मार्श, कॅमरॉन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस आणि ग्लेन मॅक्सवेलचा समावेश आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून एश्टन एगर आणि अॅडम झाम्पाला संघात स्थान देण्यात आलं आहे. 

ऑस्ट्रेलियन संघ -

पॅट कमिन्स (कप्तान), स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), जोश इंग्लिश, सीन एबॉट, एश्टन एगर, कॅमरोन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, अॅडम झाम्पा और मिचेल स्टार्क.

ऑस्ट्रेलिया प्रमुख दावेदार

ऑस्ट्रेलियन संघ ज्या पद्धतीने मागील काही काळापासून क्रिकेट खेळतोय ते पाहता आणि आयपीएलच्या माध्यमातून भारतात खेळण्याची सवय असल्याने त्यांच्याकडे जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.