मुंबई : भगवान शिवाला भांग पसंत आहे तर महाकाली देवीला खिचडी, देवी लक्ष्मीला खीर पसंत आहे. तर गणपती बाप्पांना प्रसादाच्या रूपात मोदक प्रिय आहेत.
बाप्पांचं मोदक प्रेम असं आहे की, त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये त्यांच्या हातात मोदक नक्की दिसतोच. यासोबतच काही फोटोंमध्ये बाप्पाचं वाहन असलेला मूषकही मोदक खाताना अनेकदा बघायला मिळतं.
गनणपत्यथर्वशीर्षमध्ये तर असं म्हटलंय की, "यो मोदकसहस्त्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति" म्हणजेच एखाद्या भाविकाने बाप्पाला १ हजार मोदकांचां प्रसाद चढवला तर बाप्पा त्या भक्ताची मनोकामना पूर्ण करतो. म्हणजे त्याची ईच्छा पूर्ण होते.
बाप्पांचा एक दात तुटला आहे. त्यामुळे बाप्पाला एकदंत असं संबोधलं जातं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. दोन्ही प्रकारचे मोदक नरम आणि तोंडात सहज मिसळणारे असतात. त्यामुळे एक दात नसतानाही गणेशजी सहजतेने मोदक खाऊ शकतात. त्यामुळे त्यांना मोदक अधिक पसंत असल्याचे मानले जाते.
मोदक शूद्ध पीट, तूप, मैदा, खवा, गूळ आणि नारळापासून तयार केला जातो. त्यामुळे मोदक आरोग्यासाठीही गुणकारी मानला जातो. या पदार्थाला अमृततुल्य मानलं जातं. मोदकामध्ये अमृततुल्य असल्याची कथा पद्म पुराणाच्या सृष्टी खंडात आहे.
पुराणानुसार देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला. बाप्पाने जेव्हा माता पार्वतीकडून मोदकांचे गुण जाणून घेतले तेव्हा बाप्पाची मोदक खाण्याची तीव्र इच्छा झाली आणि ते मोदक त्यांनी खाल्ले. हे मोदक खाऊन गणेशजींना अपार संतुष्टी मिळाली. तेव्हापासून गणेशजींना मोदक अधिक प्रिय आहेत.
यजुर्वेदात गणेशजींना ब्रम्हांडाचा कर्ताधर्ता मानण्यात आलं आहे. त्यांच्या हातातील मोदकाला ब्रम्हांडाचं स्वरूप आहे. ज्याला गणेशजींने धारण केलं आहे. प्रलयकाळात गणेशजी ब्रम्हांड रूपी मोदक खाऊन सृष्टीचा अंत करतात आणि पुन्हा सृष्टीच्या आरंभासाठी ब्रम्हांडाची रचना करतात. गणेश पुराणातही याचा उल्लेख मिळतो.