कार्तिकी एकादशीला होईल भाग्योदय; फक्त चुकूनही करू नका 'ही' कामे

Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशी गुरुवार २३ नोव्हेंबरला आहे. या दिवशी पंढरीत वैष्णवांचा मेळावा जमतो. पण तुम्हाला माहितीये का या दिवशी काही नियमही पाळले जातात. 

Updated: Nov 22, 2023, 05:43 PM IST
कार्तिकी एकादशीला होईल भाग्योदय; फक्त चुकूनही करू नका 'ही' कामे title=
What To Do And Not To Do On Kartiki Ekadashi 2023

Kartiki Ekadashi 2023: कार्तिक महिन्याच्या शुल्क पुक्षातील एकादशी तिथीला कार्तिकी एकादशी म्हणतात. या एकादशीला प्रबोधिनी किंवा देवउठणी एकादशी असंही म्हणतात. आषाढी एकादशी इतकंच महत्त्व कार्तिकी एकादशीला देखील असते. पंढरीत वारकरी मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. कार्तिकी एकादशीला चातुर्मास व्रताचा शेवटचा दिवस मानला जातो. या एकादशीनंतरच घरात शुभ कामे केली जातात. पुराणांमध्ये या कार्तिकी एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीची जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते, असा उल्लेख आढळतो. 

कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी का म्हणतात?

या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासात चार महिने निद्रावस्थेत जातात. ते कार्तिक एकादशीला जागे होतात आणि पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा भार पुन्हा उचलतात, म्हणून कार्तिकी एकादशीला देवउठनी एकादशी असं म्हणतात. 

शास्त्रानुसार, कार्तिकी एकादशी साजरी करताना काही नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. तरंच, एकादशीच्या व्रताचा लाभ मिळतो. या नियमांकडे कानाडोळा केल्यास काही अडचणी निर्माण होतात. 

कार्तिकी एकादशीला काय करावं?

कार्तिकी एकादशीला ब्राह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे व ध्यान करुन व्रताचा संकल्प करावा. त्याचबरोबर पित्राच्या नावाने दान करा. 

भागवान विष्णु यांना अभिषेक करा आणि साजूक तुपाचा दिवा लावून आरती करा. त्यानंतर विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करुन श्रीहरीचे भजन व किर्तन करा. 

भगवान विष्णु यांना नैवेद्य दाखवा

कार्तिकी एकादशीच्या तिथीवर निर्जळी उपवास करा आणि भजन किर्तन करुन दान अवश्य करा. 

कार्तिकी एकादशीला गायीची सेवा करा आणि गरीब व जरुरतमंद लोकांना जेवण द्या. 

कार्तिकी एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करु नका

कार्तिकी एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळावे. 

कार्तिकी एकादशीच्या दिवशी बाहेर जावून भांडणे करु नये. चुकूनही कोणाचा अपमान करु नये. 

कार्तिकी एकादशीच्या दिवशी मांस-मदिराचे सेवन करु नये. त्याचबरोबर, लसूण-प्याजसारखे तामसिक भोजन करु नये. तुम्ही व्रत करत नसाल तरीदेखील यादिवशी सात्विक आहार घेतात. 

कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह केला जातो. या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. 

कार्तिकी एकादशीच्या दिवशी नखं कापू नये, केस कापू नये

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )