Weekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे 'या' राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?

Saptahik Rashi Bhavishya 04 To 10 march 2024 : या आठवड्यात कुंभ राशीत शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हा पहिला आठवडा काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Mar 3, 2024, 10:45 PM IST
Weekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे 'या' राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी? title=
Weekly Horoscope 04 To 10 march 2024 Check Weekly Horoscope Astrology Predictions Zodiac Signs Saptahik Rashi Bhavishya in Marathi

Weekly Horoscope 04 To 10 march 2024 : मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात कुंभ राशीत शुक्र, सूर्य आणि शनि यांचा त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. यातून शश राजयोगाची निर्मिती होणार आहे. त्रिग्रही योग, षष्ठ राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.  (Weekly Horoscope 04 To 10 march 2024 Check Weekly Horoscope Astrology Predictions Zodiac Signs Saptahik Rashi Bhavishya in Marathi )

मेष (Aries Zodiac)  

या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबींमध्ये लाभदायक ठरणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. सुंदर भविष्यासाठी तुम्ही काही ठोस गुंतवणूक करणार आहात. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी लाभणार आहे. तर तुम्ही संवादाने प्रकरणे सोडवली तर बरे होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या क्षेत्रात थोडे प्रतिबंधित वाटण्याची शक्यता आहे. हा आठवडा सहलींसाठी योग्य नसून ते पुढे ढकलणं चांगल होईल. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धी घरात नांदणार आहे. 

शुभ दिवस : 4,5,8

वृषभ (Taurus Zodiac) 

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अनुकूल असणार आहे. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी तुम्हाला लाभणार आहे. या आठवड्यात तुम्हाला काही प्रलंबित पैसे परत मिळणार आहे. तुम्हाला कुटुंबात चांगली बातमी कानावर पडणार आहे. तरुणांकडून पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्व काही ठीक असणार आहे. या आठवड्यात प्रवास करु नका. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती लाभणार आहे. 

शुभ दिवस : 4,6,8

मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमच्या मान-सन्मानही वाढणार आहे. या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असले तरी आर्थिक फायदा होणार आहे. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलल्यास चांगले परिणाम करणार आहे. या आठवड्यात कौटुंबिक समस्या वाढणार आहे. कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य नाजूक होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी, उग्र व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीशी मतभेद होणार आहे. 

शुभ दिवस : 4,5

कर्क (Cancer Zodiac)   

कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबतीत त्यांच्या कुटुंबाकडून भरपूर सहकार्य मिळणार आहे.  त्यांच्या सहवासात घालवलेल्या वेळेचा आनंद मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं सततचे प्रयत्न तुमच्यासाठी चांगले भाग्य बदलणार आहे. मातृसत्ताक स्त्रीवर आर्थिक खर्च जास्त होणार आहे. प्रवासासाठी हा आठवडा शुभ असून या आठवड्यात प्रवासातून चांगली बातमी मिळणार आहे. 

शुभ दिवस : 6,7,8

सिंह (Leo Zodiac) 

सिंह राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पात जितके जास्त विचार आणि निर्णय घ्याल तितके चांगले परिणाम मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात देवाचा आशीर्वाद लाभणार आहे. प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासात मध्यम यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटण्याची शक्यता आहे.

शुभ दिवस : 4,5,6

कन्या (Virgo Zodiac)    

कन्या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी उत्साह असणार आहे. भागीदारीत केलेली कामं तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येणार आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत बरेच बदल पाहिला मिळणार आहे. वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाने जीवनात आनंदाची दार ठोठावणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातही भरपूर यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या प्रवासात खूप व्यस्त असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहे. 

शुभ दिवस: 4,6,7,8 

तूळ (Libra Zodiac)  

या आठवडय़ात तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. कुठूनतरी आर्थिक लाभाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. कोर्ट केसेसमध्ये तुमचा विजय होणार आहे. तुमची संपत्ती वाढणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मध्यम यश मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबात आनंद आणि सुसंवाद साधण्याच्या अनेक संधी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवणार आहात. या आठवड्यात, सहली दरम्यान भावनिक त्रास वाढणार आहे. त्यामुळे प्रवास टाळणे तुमच्या हिताचं ठरेल. 

शुभ दिवस: 4,6

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठवडा लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही कामावर घेतलेली मेहनत भविष्यात तुम्हाला चांगले परिणाम देणार आहे. आर्थिक बाबींमध्ये खर्च वाढणार आहे. हळूहळू कुटुंबात शांतता नांदेल आणि मन प्रसन्न राहणार आहे. हा आठवडा सहलींसाठी योग्य नाही आणि त्या पुढे ढकलणे चांगले ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या तरुण व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार आहे.

शुभ दिवस : 5,8 

धनु (Sagittarius Zodiac) 

धनु राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. वडीलधाऱ्या व्यक्ती पुढे येऊन तुम्हाला मदत करणार आहात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक समारंभातही सहभागी होणार आहात. आर्थिक बाबींमध्ये खर्च जास्त होणार आहे. या आठवड्यात तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. अन्यथा तुमचे आरोग्याची समस्या त्रासदायक ठरु शकते. नवीन विचार तुमच्या कुटुंबात आनंद आणणार आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या शांत, निर्जन ठिकाणी जाणार आहात. धार्मिक कार्याकडेही मन आकर्षित होणार आहे. 

शुभ दिवस : 6,8

मकर (Capricorn Zodiac)  

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. युवकांना यश संपादन करता येणार आहे. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात प्रवासादरम्यान अनेक बदल होणार आहेत. कौटुंबिक बाबींमध्ये मन अस्वस्थ राहणार आहे. या आठवड्याच्या शेवटी निष्काळजीपणा तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. 

शुभ दिवस : 4,7

कुंभ (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. प्रियजनांच्या सहवासात तुम्ही आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रकल्पात यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत, कोणतीही नवीन गुंतवणूक तुमच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. या आठवड्यात पैसा खर्च जास्त होणार आहे. आठवड्याच्या शेवटी काही नुकसान होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या.

शुभ दिवस : 6,7

मीन  (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमचे प्रकल्प तुमच्यासाठी आनंददायी परिणाम आणि यश घेऊन येणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नवीन प्रकल्पाबाबत चांगली बातमी मिळणार आहे. जुना अडकलेला पैसा या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी तुम्हाला लाभणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याचा निर्णयही घेणार आहात. या आठवड्यातील प्रवास टाळा.  अहंकाराचा संघर्ष वाढू देऊ नका. 

शुभ दिवस : 4,5

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)