Vastu Tips : पर्समध्ये ठेवलेल्या या गोष्टी तुम्हाला कंगाल करु शकतात, आताच काढून टाका

पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवणं महागात पडू शकतं. जाणून घ्या.

Updated: Jun 7, 2022, 04:05 PM IST
Vastu Tips : पर्समध्ये ठेवलेल्या या गोष्टी तुम्हाला कंगाल करु शकतात, आताच काढून टाका title=

Vastu Tips for Money : अनेक जण आज चांगला पैसा कमावतात. पण महिना संपण्यापूर्वी त्यांची पर्स रिकामी होते. तुमची इच्छा असली तरी तुम्ही तुमचा खर्च थांबवू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की यामागे तुमची पर्स देखील असू शकते.

अनेक वेळा आपण अशा वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवतो ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येते. त्यामुळे बहुतांश लोकांना पैशांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वास्तुनुसार पर्समध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या गोष्टी असू नयेत. चला जाणून घेऊया पर्समधून कोणत्या वस्तू लगेच काढल्या पाहिजेत.

देवांचे फोटो

वास्तुशास्त्रानुसार देवतांचे फोटो पर्समध्ये कधीही ठेवू नये. यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल आणि कर्ज वाढू शकते.

मृत लोकांचे फोटो

अनेक जण आपल्या पर्समध्ये मृत व्यक्तींचे फोटो ठेवतात. पण असं करू नये. कारण यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

चावी

वास्तूनुसार पर्समध्ये चाव्या कधीही ठेवू नयेत. कारण यामुळे व्यक्तीच्या प्रगतीमध्ये नकारात्मकता येते. ज्यामुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पर्समध्ये कोणत्याही प्रकारची चावी ठेवू नका.

बिले

अनेकांना अशी सवय असते की ते अनेक प्रकारची बिले आपल्या पर्समध्ये ठेवतात. पण लोकांची ही सवय त्यांना कंगाल बनवते. वास्तूनुसार पर्समध्ये बिल ठेवल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. धनहानीही होऊ शकते. त्यामुळे कधीही पर्समध्ये कोणत्याही प्रकारचे बिल ठेवू नये.