तुम्हीही ही चूक करताय? पैसे मोजताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा...

प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही विशिष्ट गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत.

Updated: Nov 13, 2022, 05:16 PM IST
तुम्हीही ही चूक करताय? पैसे मोजताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा...  title=
vastu tip counting money

Vastu Tips: आपल्याला अनेक गोष्टींच्या सवयी असतात कधी चांगल्या तर कधी वाईट. पण काही वेळा आपल्या लक्षात येतं नाही की आपल्या काही चुकीच्या सवयी (Bad Habits) आपल्याला महागातही पडू शकतात. आम्ही येथे पैसे मोजण्याच्या सवयीबद्दल बोलत आहोत. किंबहूना आपण पैशांच्या बाबतीत (Money) काही प्रमाणात हलगरजीही करतो त्यामुळे आपल्याला अनेकदा त्याचा फटकाही बसतो. तेव्हा जाणून घेऊया नक्की यावेळी आपण कशी आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे. (vastu tips stop making these mistakes while counting money know more)

प्रत्येक गोष्ट करण्यामागे काही विशिष्ट गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत. यापैकी काही कामे खूप महत्त्वाची आहेत आणि ती करताना झालेल्या चुका देवी लक्ष्मीला (Godess Laxmi) नाराज करू शकतात. यामुळे आपल्या जीवनात अनेकदा आर्थिक परिस्थितीही (Financial Problems) बिकट होऊ शकते. या चुका पुन्हा पुन्हा केल्यानं आपल्या आयुष्यात (Financial Crisis) मोठं आर्थिक संकटही उद्भवू शकतं. त्यामुळे अशा चुका करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वात पहिली काळजी घ्यायची असते ती म्हणजे पैसे मोजतानाची.  

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

पैसे मोजताना केलेल्या चुका लक्ष्मीला नाराज करू शकतात. यामुळे तुम्हाला अनावश्यक खर्च, घरात पैसे न राहणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे खालील गोष्टी करा म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. 

पैसे मोजताना या चुका होऊ देऊ नका : 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

  • पैसे मोजण्यात चुका करू नयेत. त्यामुळे पर्समध्ये फक्त पैसे ठेवा, अनावश्यक कागदपत्रे किंवा बिले ठेवू नका. असे केल्याने धनहानी होईल आणि पैसा तुमच्याकडे टिकणार नाही. 
  • अनेकांना पैसे मोजताना थुंकी (Splitting) लावण्याची सवय असते तर कृपया असं करून नका असं केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते आणि कठोर परिश्रम करूनही व्यक्तीला नेहमी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. यासोबतच नोटांवर थुंकण्याची ही घाणेरडी सवय आरोग्यावर परिणाम करते. 
  • नोटा कधीही फाटू नका. त्या नेहमी सुव्यवस्थित ठेवा आणि त्याचा आदरानं वापर करा. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)