Tulsi Vivah 2023 : दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुलसीच्या लग्नाचे. हा दिवस म्हणजे तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव. असं म्हणतात तुळशीच्या लग्नाने दिवाळीची सांगता होते. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न पार पडतं. देवउठनी एकादशीला विष्णू देव चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतो असं म्हणतात. तुळशी विवाहपासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. पूर्वीच्या काळात तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचं लग्न घरातील किशोरवयीन मुलासोबत किंवा शाळीग्राम दगडासोबत केलं जायचं. (tulsi vivah 2023 3 auspicious yoga tulsi vivah puja vidhi muhurta importance significance in marathi)
यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबरला रात्री 0902 वाजता सुरू होणार आहे. तर 24 नोव्हेंबरला रात्री 07.05 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मानुसार उदय तिथीला सण साजरा करण्यात येतो. म्हणून उदय तिथीनुसार 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला सुरुवात होणार आहे. प्रदोष काळात तुळशी विवाह केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी 5.25 पासून प्रदोष काल सुरु होणार आहे.
अमृत सिद्धी योग
तुळसी विवाहाच्या दिवशी सकाळी 6.51 वाजल्यापासून अमृत सिद्धी योगाला सुरुवात होत असून संध्याकाळी 04.00 वाजेपर्यंत असणार आहे.
सर्वार्थ सिद्धी योग
तुळसी विवाहाच्या दिवशी दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग असून हा धार्मिक कार्य अत्यंत शुभ मानली जातात.
सिद्धी योग
कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीलाही सिद्धी योग असून जो 24 नोव्हेंबरला सकाळी 09.05 वाजेपर्यंत असणार आहे.
तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करण्यात येतं. त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढण्यात येतं. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान करा. वृंदावनात ऊस, झेंडूची फुलं अर्पण केली जातात. तर मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवण्यात येतो. हा विवाह सोहळा संध्याकाळी संपन्न करण्यात येतो. तुळशीविवाहासाठी अंगणात छान रांगोळी काढली जाते.
प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार किंवा हौसेने तुळशीला सजवतात आणि हा सोहळा थाट्यात करतात. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील परिधान करतात. तुळशीला नवरीसारखे सजवलं जातं. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा केली जाते. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घातले जातात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरली जाते. तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार करण्यात येतं.
लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आणि तुलसीपत्रासोबत सोने आणि चांदीची तुळस आसनावर ठेवण्यात येते. श्रीकृष्णाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसनावर बसवण्यात येतं. गोरज मुहूर्तावर वराचं पूजन करण्यात येतं. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. अशा प्रकारे हा सोहळ्या कुटुंबिय सदस्यांसोबत आणि प्रियजनांसोबत साजरा करण्यात येतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)