Tuesday Tips : तुम्ही मंगळवारी करत नाहीत ना 'ही' काम, अन्यथा होईल नुकसान.. सतर्क राहा

मंगळवारी 'ही' काम टाळा, अन्यथा होईल नुकसान

Updated: Oct 5, 2021, 08:00 AM IST
Tuesday Tips : तुम्ही मंगळवारी करत नाहीत ना 'ही' काम, अन्यथा होईल नुकसान.. सतर्क राहा title=

मुंबई : संकटमोचक हनुमान (Lord Hanuman) यांची पूजा-आराधना करण्यासाठी मंगळवार हा सर्वश्रेष्ठ दिवस समजला जातो. कारण आठवड्यातील हा दिवस महत्वाचा मानला जातो. हा दिवस हनुमान यांच्याकरता समर्पित केलं जातं. धर्म-शास्त्र, ज्योतिष शास्त्रानुसार जो दिवस देवाला समर्पित केला जातो. त्या देवाची पूजा मनोभावे करावी. याचा प्रत्येकाला फायदा होईल.  

मंगळवारी हे काम करू नका 

मंगळवारी या सर्व गोष्टी करणे टाळावे. अन्यथा होईल नुकसान. पूजा न केल्यास जीवनावर होईल परिणाम. तसेच मंगळवारी मांसाहारी-अल्कोहोल अजिबात घेऊ नका. असे केल्याने आर्थिक संकटाला वेळ लागणार नाही.

मंगळवारी केस आणि नखे कापू नका. यामुळे पैशाचे नुकसानही होते. मंगळवारी ब्रह्मचर्य पाळा कारण या दिवशी जन्मलेली मुले म्हातारी आणि अहंकारी असतात.

मंगळवारी पैशाचे व्यवहार करणे टाळा. विशेषत: उधार देऊ नका किंवा उधार घेऊ नका. असे केल्याने पैशाचे नुकसान होते, म्हणजेच जर ते उधार घेतले गेले, तर त्याचे ओझे वाढेल आणि दिले तर ते पैसे बुडू शकतात.

मंगळवारी तीक्ष्ण वस्तू खरेदी करू नका. असे केल्याने जीवनात अशांतता वाढेल. घरात भांडणे वाढतात. मंगळवारी पश्चिम आणि उत्तर दिशेने प्रवास टाळा. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, गूळ खावा आणि घरातून बाहेर पडताना पाणी प्या, तर प्रवासाला जा.