Trigrahi Yog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता

Trigrahi Yog In Capricorn: नव्या वर्षाला अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करतात. 2024 च्या सुरुवातीला मकर राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. मंगळ, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतोय.

सुरभि जगदीश | Updated: Dec 8, 2023, 10:55 AM IST
Trigrahi Yog: नववर्षाच्या सुरुवातीला बनणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता title=

Trigrahi Yog In Capricorn: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका अंतराने ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहाच्या स्थिती बदलामुळे संयोग तयार होतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि राशींवर होताना दिसतो. ग्रहांची ही युती काही लोकांसाठी सकारात्मक आणि इतरांसाठी नकारात्मक परिणाम देणारी असते.

नव्या वर्षाला अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करतात. 2024 च्या सुरुवातीला मकर राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. मंगळ, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतोय. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

मकर रास (Makar Zodiac)

त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत असेल. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकणार आहात. सूर्यदेवाच्या प्रभावामुळे तुमचा एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. 

तूळ रास (Tula Zodiac)

त्रिग्रही योग तयार झाल्याने तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहेत. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीही मिळू शकते. तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव वाढणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि आईकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो.

वृषभ रास (Taurus Zodiac)

त्रिग्रही योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी नशीब तुमची साथ देणार आहे. तुमची प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षा स्पर्धेत अपेक्षित यश मिळू शकतं. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. प्रलंबित पैसे परत मिळतील आणि व्यवसायात अपेक्षित यशही मिळेल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)