Trending News : जेवणात पोळी आणि भात वाढताना तुम्ही देखील 'ही' चूक करता मग थांबा, नाहीतर...

Vastu Tips : घरात मोठी माणसं अनेक वेळा सांगता ताट्यात कधी एकत्र 3 पोळ्या वाढू नयेत (Why Not To Serve 3 Rotis). अगदी भात वाढतानाही अनेक जणी या चुका करतात... शास्त्रामध्ये ताट वाढताना कुठल्या चुका करु नये हे सांगण्यात आलं आहे.  

Updated: Dec 25, 2022, 12:07 PM IST
Trending News : जेवणात पोळी आणि भात वाढताना तुम्ही देखील 'ही' चूक करता मग थांबा, नाहीतर... title=
Trending News roti rice rules vastu tips and astrology Dont make these mistakes in a plate nmp

Vastu Tips For Roti : भारतात ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रला विशेष महत्त्व आहे. भारतात पाहुण्याची आवभगत करणे ही परंपरा आहे. भारतीय संस्कृतीत पाहुण्याला ताट वाढताना काही विशेष नियम पाळले गेले पाहिजे अन्यथा तुमच्यावर आणि घरांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता असते असं शास्त्रात सांगितलं आहे. आपल्याकडे मोठी लोक नेहमी सांगता ताटात कधी एकत्र 3 पोळी म्हणजे चपाती वाढू नयेत. यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

एकाच वेळी 3 चपात्या ताटात वाढू नये

अनेकवेळा अनवधानाने आपल्याकडून छोट्या-छोट्या चुका आपल्या आयुष्यात मोठा परिणाम करतात. यापैकी एक चूक म्हणजे चपाती चुकीच्या पद्धतीने सर्व्ह करणं. यामुळे आर्थिक विवंचनेसोबतच घरगुती त्रासाचाही प्रश्न कुटुंबात निर्माण होतो. सनातन धर्मानुसार, जेवण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी तीन पोळ्या देऊ नयेत. असं केल्याने घरातील सुख-शांती भंग पावते आणि नकारात्मक ऊर्जा कुटुंबावर वर्चस्व गाजवते. त्याऐवजी तुम्ही एक किंवा दोन चपात्या सर्व्ह करा. त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार 3 हा अशुभ आकडा असतो. म्हणून तुम्ही पाहिलं असेल पोळी वाढता एका पोळीचे समान चार भाग करुन ती ताट्यात वाढली जाते. (Trending News roti rice rules vastu tips and astrology Dont make these mistakes in a plate )

भातबद्दल  नियम

शास्त्रानुसार भात ताट्यात वाढताना कधीही एक चमचा वाढू नये. कायम दोन चमचे भात वाढला गेला पाहिजे. शिवाय आहारतज्ज्ञ म्हणतात की, एक वाटी भात हा आरोग्यासाठी उत्तम म्हणून भारतीयांकडे ताट वाढताना छान गोल वाटत भात भरुन नंतर तो ताटात वाढला जातो. 

पोळी हातात देऊ नका

अनेक वेळा अन्न खाताना ताटातली पोळी संपते. अशा परिस्थितीत, त्या व्यक्तीला हातात चपाती देऊ नये. हातात चपाती देऊन सेवा करणं म्हणजे गरिबीला आमंत्रण देणं मानलं जातं. असं मानले जाते की, हातात भाकरी दिल्याने अन्नाचं पुण्यंही संपतं, त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नये. 

शिवाय कुठल्या दिवशी घरातील स्वयंपाकघरात पोळी करु नये साठीही नियम सांगितले आहेत.

या दिवशी चपाती बनवू नका. 

1. कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यू झाला असेल तर 

आपण घरात कायम प्रत्येकासाठी चपाती बनवतो. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार जर घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यादिवशी चपाती करु नये. तेराव्या विधीनंतर चपाती करावी असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर या नियमाचं पालन केलं नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, मृत व्यक्तीच्या सूक्ष्म शरीरावर फोड येतात. 

2. नागपंचमी

नागपंचमीच्या दिवशीही स्वयंपाकघरात चपाती बनवू नका, असं शास्त्रात लिहिलं आहे. या दिवशी फक्त खीर, पुरी आणि हलवा या गोष्टी खाव्यात. नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवण्यास मनाई आहे, असं सांगितलं आहे. लोखंडी जाळी ही सापाच्या फणीची प्रत मानली जाते. म्हणूनच नागपंचमीला तव्याला अग्नीवर ठेवू नये.  

3. शीतलाष्टमी

ज्योतिषशास्त्रानुसार शीतलाष्टमीला माता शीतला देवीची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी आईला शिळे अन्न अर्पण करावं असं मानलं जातं. मातेला अन्न अर्पण करण्यासोबतच शिळे अन्न खाल्ले जातं. या दिवशी सूर्योदयापूर्वी मातेला शिळे अन्न अर्पण केलें जातं आणि हा फक्त प्रसाद म्हणून स्वीकारला जातो.

4. शरद पौर्णिमा

शास्त्रानुसार शरद पौर्णिमेलाही चपाती बनवण्यास मनाई आहे. या दिवशी चंद्र 16 कलांमध्ये निपुण असतो. या दिवशी संध्याकाळी शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवून चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून ग्रहण केली जाते. चांदण्यात ठेवलेली खीर खाण्याच्या परंपरेमुळे त्या दिवशी घरी चपाती भाजली जात नाही. 

5. मातालक्ष्मीचे सण

शास्त्रात सांगितले आहे की, जे काही सण मां लक्ष्मीशी संबंधित आहेत, त्या दिवशी चपाती करू नये. यामध्ये प्रामुख्याने दिवाळीचा सण समाविष्ट आहे. या दिवशी फक्त सात्विक अन्न, पुरी, मिठाई इत्यादींचं सेवन केलं जातं. पण या दिवशी घरी चपाती करणे टाळावे.

'हे' नियम लक्षात ठेवा!

जास्त चपाती बनवा

वास्तुशास्त्रानुसार घरातील सदस्यांच्या संख्येपेक्षा 4-5 अधिक चपात्या नेहमी बनवल्या पाहिजेत. कारण पहिली रोटी गायीला खायला द्यावी आणि शेवटची रोटी कुत्र्याला खाऊ घालणे शुभ मानलं जातं. घरातील ज्येष्ठ मंडळी कायम म्हणतात मोजून चपाती करु नयेत. 

पाहुण्यांसाठीही चपाती ठेवा

वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना पाहुण्यांसाठी 2 चपात्या बनवल्या पाहिजेत. कारण घरी आलेला पाहुणा हा देवासारखा असतो. म्हणूनच घरी आलेल्या पाहुण्याला कधीही उपाशी पाठवू नये. म्हणूनच दोन चपत्या जास्त करा. जेणेकरून माँ अन्नपूर्णेचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहिल. जर कोणी पाहुणे आले नाही तर या चपात्या कुत्र्यांना, मांजरींना किंवा पक्ष्यांना खायला द्या.

या पीठाने चपाती बनवू नये

वास्तुशास्त्रानुसार पीठ मळल्यानंतर कधीही फ्रिज इत्यादीमध्ये ठेवू नये. कारण शिळ्या पिठापासून बनवलेल्या चपातीमुळे कुटुंबावर संकट येतं. यासोबतच अनेक प्रकारचे बॅक्टेरियाही निर्माण होतात. यासोबतच शिळी चपाती म्हणजे राहुशी संबंधित आहे. म्हणूनच तुम्ही कुत्र्याला शिळ्या पिठाची चपाती देऊ शकता. दुसरीकडे, ताजी चपाती ही मंगळ मजबूत करते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)