राशीभविष्य | बुधवार | २७ फेब्रुवारी २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 27, 2019, 08:51 AM IST
राशीभविष्य |  बुधवार | २७ फेब्रुवारी २०१९  title=

मेष- कामाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करा. इतरांचे सल्ले ऐका. नवीन व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. शिक्षण, व्यापार, नोकरीच्या निमित्ताने प्रवासयोग आहे. या प्रवासादरम्यान काही नव्या गोष्टी तुम्हाला कळतील. लग्नाविषची चर्चा होतील. 

वृषभ - अचानक फायदा होण्याची चिन्हं. धनलाभ होण्याची शक्यता. अशा व्यक्तींची भेट घडेल जे तुमचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रेरणादायी ठरतील. आज भावना आणि तणावाच्या गोष्टींविषयी इतरांशी चर्चा कराल. दैनंदिन कामं पूर्ण होतील. साथीदाराची मदत होईल. 

मिथुन- आत उत्साह शिगेला असेल. नव्या लोकांशी जोडले जाऊ शकाल. नात्याचे काही नवे पैलू तुमच्यासाठी खास ठरतील. अडकलेली आणि रेंगाळलेली कामं पूर्ण कराल. अचान समोर येऊन ठाकणाऱ्या कामांसाठीही तयार असाल. 

कर्क- मुलाबांळांची मदत होईल. व्यापाराच्या बाबतीत नशीबाच्या साथीने बरीच कामं पूर्ण होतील. व्यापार आणि रोजगाराविषयी खास माहिती मिळेल. विचारात असणारी सर्व कामं पूर्णत्वास न्याल. 

सिंह- रोजच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नवी मैत्री आणि त्यांच्याशी नवे संपर्क प्रस्थापित कराल. व्यक्तीमत्व आणि कार्यक्षमता आज विकसित होईल. स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या- सहानुभूतीपूर्ण वागणूक असेल. अनेक गोष्टींचा सारासार विचार कराल. कोणा एका मित्राला तुमच्या सल्ल्याचा फायदा होईल. सोबत असणाऱ्यांच्या अडचणी तुमच्या मदतीने दूर होतील. 

तुळ- कोणा एका कारणामुळे फार उत्साही असाल. चांगलं बोलून, प्रयत्न करुन काही गोष्टी साध्य कराल. महत्त्वाची कामं, नोकरीसाठीची मुलाखत यामध्येही यशस्वी ठराल. दृष्टीकोन सकारात्मक असेल. कुटुंबात नव्या सदस्याचा प्रवेश होणार. स्वत:वर विश्वास ठेवा. 

वृश्चिक - दिवस आनंददायी असेल. स्वत:मध्ये काही महत्त्वाचे बदल कराल तर दिवस चांगला जाईल. करिअरच्या दृष्टीने दिवस महत्त्वाचा. नातेवाईकांना भेटण्याचे योग. नोकरीच्या ठिकाणी विनम्र राहा. 

धनू- काही प्रमाणात व्यावहारिक असाल ज्याचा तुम्हालाच फायदाच होणार आहे. भावनिकदृष्ट्याही उत्साही असाल. स्वत:सोबतच इतरांवरही विश्वास असेल. नवे विचार मनात घर करतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

मकर- दिवस व्यग्र असेल. तुमच्या कामांमधून काढता पाय घेऊ नका. अर्थार्जनाच्या काही चांगल्या संधी आहेत. व्यापाराच्या बाबतीत काही नव्या योजना आखाल. ज्याचा भविष्यात फायदा होणार आहे.

कुंभ- देवाणघेवाणीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला असेल पण, त्याकडे गांभीर्याने पाहा. भविष्याकतील योजनांवर एककेंद्री राहा. साथीदारासोबत असणारे मतभेद संपुष्टात येतील. साथीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. आई- वडिलांची मदत मिळेल.

मीन- नशीबाची साथ मिळेल. ज्या लोकांशी भेट घडेल त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळेल. यावेळी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची आशा आहे.