Kinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! 'या' चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

Kinkrant 2024 : भोगी आणि मकर संक्रांत नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस संक्रांत करिदिन म्हणून पाळला करण्यात येतो. यादिवशी काही गोष्टी करु नयेत अन्यथा तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते.   

नेहा चौधरी | Updated: Jan 16, 2024, 07:41 AM IST
Kinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! 'या' चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ  title=
Today Kinkrant means Karidin next day of makar sankranti Avoid these mistakes Otherwise the time of regret will come

Sankranti Karidin 2024 : ग्रहांचा राजा सूर्यदेवाने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने नवीन वर्षाला सुरुवात होते. हा उत्सव देशभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवसा मकर संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत पाळला केली जाते. पौष शुक्ल षष्ठीचा दिवस हा किक्रांत म्हणजेच करिदिन मानला जातो. यादिवशी चांगल्या कामाला किंवा शुभ कार्याला सुरुलात करत नाही अशी मान्यता आहे. (Today Kinkrant means Karidin next day of makar sankranti Avoid these mistakes Otherwise the time of regret will come)

किंक्रांत का पाळली जाते? पौराणिक कथेनुसार 

मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी करण्यामागे पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. त्यानुसार फार वर्षांपूर्वी संकारसुर नावाचा राक्षस होता. तो लोकांना त्रास देत होता. त्याचा वध करण्यासाठी देवी संक्रांतीचं रुप घेऊन संकरासुराला मारण्यासाठी आली. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूरचा वध केला आणि लोकांची त्याचा जाचापासून सुटका केली. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला केला जातो. तर पंचागकर्ते या दिवसाला करिदिन म्हणून संबोधतात. 

हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण

किंक्रांत ही अशुभ असल्याने 'या' गोष्टी करु नयेत!

पंचांगकर्त्यानुसार हा दिवस अशुभ मानला गेला आहे. त्यामुळे यादिवशी शुभ कार्य करु नयेत. आजच्या दिवशी स्वयंपाक घरात काही कापाकापी करत नाही. शिवाय अनेक ठिकाणी आजच्या दिवशी तिळगुळ वाटल्या जात नाही. महाराष्ट्रात या दिवशी महिला शेणात हात घालत नाहीत. शिवाय यादिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. तर काही ठिकाणी यादिवशी बेसनाचे धिरडे करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय घरातून केस काढण्याआधी महिलांनी वेणीफणी करावी. कारण मोकळ्या केसांनी किंक्रांतीला कामं करणं वर्ज्य मानलं जातं. घरात कटकट करु नये, असं म्हणतात. दूरचा प्रवास टाळावा. देवाला आजच्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. घरात आणि बाहेर सर्वांचा आदर करावा. आजच्या दिवशी कुलदैवता आणि देवाची पूजा करुन नामस्मरण करावे. तर अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करुन त्यांची पूजा केली जाते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)