Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात विहीर किंवा पाणी दिसतंय? काय आहे याचा नेमका अर्थ?

स्वप्न शास्त्रामध्ये स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचं फळ सांगितलं आहे.

Updated: Jun 8, 2022, 08:53 AM IST
Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात विहीर किंवा पाणी दिसतंय? काय आहे याचा नेमका अर्थ? title=

मुंबई : रात्री पडणारी स्वप्नं एखाद्या व्यक्तीला भविष्यातील घटनांबद्दल सावध करतात. काही स्वप्ने शुभ मानली जातात तर काही अशुभ मानतात. पण तुम्हाला कल्पना आहे का, स्वप्नशास्त्रात शुभ आणि अशुभ स्वप्नांचं वर्णन केलं आहे. असं मानलं जातं की, जर वाईट स्वप्न पडलं तर ते सर्वांना सांगावं. 

स्वप्न शास्त्रामध्ये स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचं फळ सांगितलं आहे. हे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकतं, काही लोकांना स्वप्नात सतत पाणी दिसतं. कधी स्वप्नात पाणी दिसणं शुभ असतं, तर कधी तुमच्यासाठी समस्या निर्माण होण्याचे संकेत असतात. अधिक जाणून घ्या स्वप्नात पाणी पाहणं कधी शुभ आणि कधी अशुभ.

समुद्राचं पाणी

समुद्राचे पाणी खारट असतं. स्वप्नात समुद्राचं पाणी दिसलं तर ते अशुभ लक्षण मानलं जाते. स्वप्न शास्त्रानुसार असं स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीने भविष्यात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कारण त्याच्यासोबत अपघात होऊ शकतो किंवा त्याचे नुकसान होऊ शकतं. 

स्वप्नात नदीचं पाणी दिसणं

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात नदीचं पाणी दिसलं असेल तर ते एक शुभ चिन्ह मानलं जातं. लवकरच तुमच्या सर्व अपूर्ण स्वप्नं पूर्ण होणार आहेत. हे स्वप्न सूचित करतं की, यावेळी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जी स्वप्ने तुम्ही खूप पूर्वी पाहिली होती, ती आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. या काळात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळू शकतात किंवा तुम्हाला कुठूनतरी चांगली संधीही मिळू शकते.

स्वच्छ पाणी

स्वप्नात शुद्ध आणि स्वच्छ पाणी पाहणं देखील शुभ मानलं जातं. स्वप्नात स्वच्छ पाणी दिसल्यास करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याचे संकेत मिळतात. याशिवाय नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.

स्वप्नात विहिरीचं पाणी पाहणं

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात विहिरीचं पाणी पाहिले असेल तर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे आणि तुम्हाला अचानक धन मिळू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही स्वतःला नदीत पोहताना दिसले तर याचा अर्थ असा आहे की आगामी काळात तुमच्या काही इच्छा पूर्ण होणार आहेत.