आजचे राशीभविष्य | शनिवार | ३० मार्च २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 30, 2019, 09:17 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | ३० मार्च २०१९ title=

मेष - व्यवसायिकांसाठी दिवस ठीक नाही. कोणालाही उधार पैसे देऊ नका. जुन्या उधारीचे टेंन्शन येईल. नोकरदार लोकांनी सावधतेने काम करा. सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मानसिक तणाव राहील. जोडीदाराच्या एखाद्या वागणूकीमुळे मूड खराब होऊ शकतो. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या.

वृषभ - विचार केलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभाचा योग आहे. सकारात्मक विचार कराल. मुलांकडून मदत मिळेल. विचार केलेल्या गोष्टी पूर्ण कराल आणि त्याचा फायदाही होईल. मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. 

मिथुन - व्यवसायात अचानक धनलाभ होऊ शकतो. जोडीदाराची साथ मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. चांगलं बोलून तुमचं काम पूर्ण कराल. तब्येतीबाबत टेंन्शन वाढू शकते. जेवण करताना सावध राहा.

कर्क - कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या मनासारखं नसल्याने मूड खराब होईल. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या अडचणींवर निर्णय घेणं कठीण जाईल. दररोजच्या कामात समस्या वाढतील. विचार केलेली कामंही पूर्ण होणार नाहीत. कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्या. तब्येतीत चढ-उतार राहील.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. लोकांवर प्रभाव पाडू शकता. तुमची विचार करण्याची पद्धत लोकांना आवडले. तुम्ही लोकांना दिलेल्या सल्ल्यांमुळे अनेकांना फायदा होईल. एखादी चांगली गोष्ट कानी येऊ शकते. जोडीदार तुमच्या भावना समजेल. सांध्यांची दुखणी त्रासदायक ठरतील.

कन्या - कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील याचा परिणाम कुटुंबावरही होईल. कामं पूर्ण होतील. करियर आणि गुंतवणूकीबाबत एखादी चांगली संधी मिळू शकते. पैसे आणि कुटुंबाच्या परिस्थितीकडे पूर्ण लक्ष द्या. तब्येतीत सुधारणा होईल. अनेक दिवसांपासून चालू असलेल्या तब्येतीच्या तक्रारी काही प्रमाणात कमी होतील.

तुळ - मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. बढतीची संपूर्ण शक्यता आहे. कोणतीही संधी सोडू नका. जे काम हाती घ्याल त्या कामात आवश्यक ती मदत मिळेल. लोकांडून तुमची कामं करून घेण्यास यशस्वी व्हाल. दिवस चांगला आहे. तब्येत ठीक राहील.

वृश्चिक - पैशांच्या बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. वेळेवर लक्ष द्या. काही खास कामात विषेश मेहनत करावी लागेल. आज घडलेल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच निर्णय घेऊ नका. तब्येत बरी राहील. थकवा जाणवेल. 

धनु - शेअर मार्केटमध्ये विचार करून गुंतवणूक करा. बॉससोबत सावध राहा. तुमच्या करियरसाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती त्रासदायक ठरतील. महत्त्वाचे काम पूर्ण न झाल्यास ताण घेऊ नका. संयम ठेवा. शांतपणे दिवस व्यतित करा. 

मकर - नुकसानीची शक्यता आहे. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या आर्थिक स्थितीमुळे भांडण होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा, नाहीतर नुकसान होऊ शकते. निराश राहाल. तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ - करियरबाबत चांगली बातमी मिळू शकते. शत्रूंवर मात कराल. जुने वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल तर लोक तुमच्या बाजूने असतील. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. काही गोंधळलेली प्रकरणं सोडवू शकाल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. त्यातून मदत मिळेल. व्यवसायात काही नवं केल्यास यश मिळेल. तब्येतीच्या बाबतीत सांभाळून राहा. 

मीन - करियरच्या बाबतीत संवेदनशील निर्णय घेताना सावध राहा. विचार करून गुंतवणूक करा. एखादी महत्त्वाची गोष्ट विसरू शकता. कामात चूक होण्याची शक्यता आहे. लोकांचं कामही तुमच्याकडे येऊ शकतं. थकवा जाणवेल. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार येतील. तब्येतीची काळजी घ्या. छोट्या-छोट्या समस्या वाढू शकतात.