Somvati Amavasya 2023 Pitro Daan in marathi : सोमवती अमावस्याला गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं असं शास्त्रात मानतात. हिंदू आणि सनातन धर्मात शुभ तिथींना स्नान आणि दान करण्याचे खूप महत्त्व आहे. आजपासून पंचक लागणार असल्याने आजच्या स्नानाला विशेष महत्त्वं आहे. याशिवाय आजचा दिवस म्हणजो सोमवती अमावस्याला पितरांसाठी दान केलं जातं. त्यांचा सेवेत आज काही पण कमी केल्यास घरावर संकट कोसळू शकतं. म्हणून पितरांना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी 5 महान दान करा. (Somvati Amavasya 2023 Pitro Daan and Pitro dosh pitra dosh mukti ke upay daan donate 5 things on Somvati Amavasya in marathi)
.
ज्या प्रकारे मानवाला हवामानानुसार कपड्यांची आवश्यकता असते जेणेकरून थंडी आणि उष्णता टाळू शकतील. पूर्वजांच्या बाबतीतही असंच असतं, असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. याचा उल्लेख गरुड पुराणात करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवती अमावस्येला आपल्या पूर्वजांना वस्त्र दान करा. शास्त्रानुसार धोतर आणि टॉवेल हे श्रेष्ठ दान मानलं जातं.
पौराणिक मान्यतेनुसार पितरांचं स्थान चंद्राच्या वरच्या भागात असतं, यामुळे तुम्ही चांदीपासून बनवलेल्या वस्तू पूर्वजांना दान करू शकता. यामुळे त्यांना आनंद होतो. सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतो.
पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दूध आणि तांदूळ यांसारख्या चंद्राशी संबंधित वस्तूही दान करू शकता. या दानाने संतप्त पितरही प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद मिळतात.
अमावस्येच्या दिवशी स्नान करून ध्यान करून आपल्या पितरांना काळ्या तिळाचं दान करा. इतर जे काही दान करणार असाल त्यासोबत हातात तीळ घेऊन दान करा. धार्मिक मान्यतेनुसार त्या वस्तू पितरांकडून प्राप्त होतात. ते त्यांच्या वंशावर आनंदी राहतात.
जर तुम्ही सक्षम आणि धनवान असाल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या किंवा पितृ पक्षाच्या दिवशी जमीन दान करू शकता. जमीन दान हे महान दान मानलं जातं. मोठ्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी जमीन दान केली जाते.
ज्यांनी आपल्या पूर्वजांसाठी पिंड दान केलं नाही ते सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करून पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतात. हिंदू धर्मात पिंड दानाला खूप महत्त्व आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)