Shani Nakshatra Gochar : शनीदेवाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींना रहावं सावधं, आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ

Shani Nakshatra Gochar 2023 : शनी ग्रह आता राहुच्या शतभिषा नक्षत्रामध्ये आहे. या नक्षत्रात शनी असल्यामुळे अशुभ योग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह खूप महत्त्वाचे मानले जातात. शनी आणि राहू यांच्या बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसतो.

सुरभि जगदीश | Updated: Aug 8, 2023, 09:02 PM IST
Shani Nakshatra Gochar : शनीदेवाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींना रहावं सावधं, आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ title=

Shani Nakshatra Gochar 2023: शनी ग्रह आता राहुच्या शतभिषा नक्षत्रामध्ये आहे. या नक्षत्रामध्ये शनी देव 17 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. या नक्षत्रात शनी असल्यामुळे अशुभ योग तयार झाला आहे. यावेळी याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. मात्र काही नागरिकांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे. 

ज्योतिषशास्त्रामध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह खूप महत्त्वाचे मानले जातात. शनी आणि राहू यांच्या बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसतो. शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने फिरतो तर राहू नेहमी विरुद्ध दिशेने फिरतो. दरम्यान शनीच्या या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशीच्या व्यक्तींवर वाईट परिणाम होणार आहे, ते पाहुयात.

कन्या रास

राहूच्या नक्षत्रात शनीच्या येण्याने 17 ऑक्टोबरपर्यंत काही राशींच्या लोकांना अडचणींना सामना करावा लागू शकतो. कन्या राशीच्या लोकांनी शनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्यावर खूप काळजी घ्यावी लागणार आहे. यावेळी या लोकांची आर्थिक स्थिती खूप वाईट असू शकते. या राशीच्या लोकांना धनहानी देखील होऊ शकते. वैवाहिक जीवन, प्रेम जीवन आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक रास

शनि-राहू युतीचा वृश्चिक राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या राशीच्या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचं नुकसान होऊ शकते. वृश्चिक राशीच्या लोकांनी 17 ऑक्टोबरपर्यंत खूप सावध राहण्याची गरज आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्‍यांशीही तुमचा वाद होऊ शकतो, 

मीन रास

शतभिषा नक्षत्रात शनी-राहूच्या संयोगामुळे मीन राशीच्या लोकांवर वाईट परिणाम दिसून येतो. या राशीच्या लोकांना काही मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते. या काळात तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. शनी-राहूच्या अशुभ प्रभावामुळे मीन राशीच्या लोकांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )