Shani Gochar 2024 : पुढील 6 महिने 'या' लोकांची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

Sturn Transit Purva Bhadrapada Nakshatra :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता आणि न्यायदेवा शनि ग्रहाच्या राशी बदलामुळे लोकांच्या जीवनावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम दिसून येतो. नऊ ग्रहांमधील शनि हा ग्रह सर्वात संथ गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. शनिदेव एका राशीत अडीच वर्ष राहतो. शनिदेव सध्या स्वगृही मूळ त्रिकोण कुंभ राशीत असणार आहे. कुंभ राशीत तो 2025 पर्यंत राहणार आहे. पण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव ठरावीक वेळी नक्षत्र बदल करत असतो. शनिदेव सध्या देव गुरु पूर्वाभाद्रपदाच्या नक्षत्रात 6 एप्रिलला गोचर केलंय. इथे तो 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे. शनि नक्षत्र बदलामुळे पुढील 6 महिने काही राशींची चांदीच चांदी आहे.  (Shani Gochar 2024 For the next 6 months these zodiac sign lucky saturn transit in purva bhadrapada nakshatra )

वृषभ रास (Taurus Zodiac) 

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून शनि आणि शुक्र मित्र मानले जातात. त्यामुळे शनी नक्षत्र बदल हे वृषभ राशीसाठी फायदेशीर असणार आहे. या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात चांगले दिवस घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी या लोकांचं कौतुक होणार आहे. तुमचं काम पाहून वरिष्ठ प्रसन्न होणार आहे. त्यामुळे पगार वाढ आणि प्रमोशनाची संधी चालून येणार आहे. या लोकांवर शनिची साडेसाती सुरु असल्याने नशिब यांना पूर्णपणे साथ देणार आहे. रखडलेली कामं आता मार्गी लागण्यास सुरुवात होणार आहे. संपत्तीही वाढ होणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)    

शनि नक्षत्र बदल्यामुळे या राशीच्या सहाव्या घरात शनिदेव विराजमान असणार आहे. या लोकांसाठी शनिदेवाची स्थिती बदल लाभदायक असणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. तुमच्यामधील नकारात्मकता भावना दूर होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. कुटुंबियांसोबत चांगला वेळ व्यतित करणार आहे. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येणार आहे. कोर्ट केसेसमध्ये यश तुम्हाला मिळणार आहे. परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आङे. लव्ह लाइफ उत्तम असणार आहे.  वैवाहिक जीवनातही प्रेम आणि सौभाग्य लाभणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

शनि नक्षत्र बदलामुळे सिंह राशीच्या सातव्या घरात शनिदेव असणार आहे. यामुळे या लोकांना अनेक लाभ होणार आहे. व्यवसायात आनंदाचे आणि यशाचे दिवस येणार आहे. भरपूर नफा मिळत असल्याने तुमचं मन प्रसन्न असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. शिवाय समाजात मान-सन्मान वाढणार आहे. वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपून आनंदाची चाहूल लागणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभामुळे अनेक समस्या दूर होणार आहेत. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहात. वाहन, प्लॉट, मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Shani Gochar 2024 For the next 6 months these zodiac sign lucky saturn transit in purva bhadrapada nakshatra
News Source: 
Home Title: 

Shani Gochar 2024 : पुढील 6 महिने 'या' लोकांची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

Shani Gochar 2024 : पुढील 6 महिने 'या' लोकांची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश
Caption: 
Shani Gochar 2024 For the next 6 months these zodiac sign lucky saturn transit in purva bhadrapada nakshatra
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
नेहा चौधरी
Mobile Title: 
पुढील 6 महिने 'या' लोकांची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, April 17, 2024 - 09:23
Created By: 
Neha Bhoyar
Updated By: 
Neha Bhoyar
Published By: 
Neha Bhoyar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
381