Shani Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव (Shani Gochar 2023) हा आपल्याला आपण केलेल्या कर्माची फळ देतो. जर तुम्ही चांगली कामं केली असेल तर तुम्हाला शनीदेव नक्कीच चांगलं फळ देणार पण, जर तुम्ही वाईट कर्म केले असतील तर शनीदेवाची व्रकदृष्टी तुमच्यावर असणार आहे.
शनिदेवाना 17 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आज त्याची दहावी दृष्टी वृश्चिक राशी पडणार असल्याने मालव्य आणि शश राजयोग तयार होत आहे. जवळपास 30 वर्षांनी या योग जुळून आला आहे. आज 3 राशीच्या लोकांना शनिदेवाच्या दशमीच्या दृष्टीचे शुभ लाभ मिळतील. (shani gochar 2023 in kumbh lucky for 3 zodiac signs and shani dev these zodiac signs bad results till October)
या राशीच्या लोकांसाठी शनीची दशम बाजू अतिशय फलदायक ठरणार आहे. शनिदेवामुळे कुंभ राशीत शश राजयोग आणि मालव्य राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा लाभ होणार आहे. नोकरी इच्छुकांना नोकरीची संधी मिळणार आहे. तर नोकरदार वर्गातील लोकांना त्यांचा कामाचं फळ मिळणार आहे. पदोन्नती किंवा वेतनवाढ होण्याची दाट शक्यता आहे.
शनीच्या दशम दृष्टीमुळे या राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे. व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आह. कला क्षेत्रात नाव गाजवणार आहात. हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची दशा खूप चांगली असणार आहे. वैवाहिक जीवनात सुख मिळणार आहे. पाटर्नशीपमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यात लाभ मिळणार आहे. नोकरी आणि उद्योगात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे.
तर शनीच्या राशीच्या संक्रमणामुळे काही राशींना काळजी घेण्याची गरज आहे आणि 17 ऑक्टोबरपर्यंतचा काळ काही लोकांसाठी खूप कठीण आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत कोणत्या स्थानिकांना सतर्क राहण्याची गरज आहे ते आम्हाला कळू द्या.
या राशीच्या लोकांवर व्रकदृष्टी असणार आहे. या लोकांना आरोग्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च वाढणार आहे. या शिवाय शत्रूपासून सावधान राहा, तो तुम्हाला त्रास देणार आहे.
या राशीच्या लोकांना 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कुठलाही व्यवहार करताना शंभर वेळा विचार करा. डोक्यावरील कर्ज अजून वाढ शकतं. शिवाय आरोग्याची विशेष काळजी घ्या.
वडिलोपार्जित मालमत्ता किंवा जमिनीतून घरात वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याचा समस्या जाणवणार आहे. रक्त किंवा हृदयासंबंधित समस्या होण्याची दाट शक्यता आहे. कुठलाही निर्णय घेताना तज्ज्ञांनाचा सल्ला नक्की घ्या.
या राशीच्या लोकांना शनीची साडेसाती चालू आहे. त्यामुळे या लोकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याची संबंध त्रास देणार आहे. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. अनेक अनपेक्षित खर्च वाढणार आहेत.