Shani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा

Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रातील कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव जेव्हा दृष्ट राहूच्या नक्षत्रात गोचर करतं तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो. मात्र काही राशींचं भाग्य उजळतं. 

नेहा चौधरी | Updated: Dec 1, 2023, 02:40 PM IST
Shani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा title=
Saturn transit in Rahu constellation the people of this zodiac sign will get huge money Shani Rahu Nakshatra

Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे वेगळे महत्त्व असून ते ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. ग्रहांच्या या संक्रमणामुळे मानवी जीनवावर शुभ अशुभ परिणाम होतो ना दिसतात. सर्व ग्रहांपैकी म्हणजे 9 ग्रहांपैकी शनि हा सर्वात संथ गतीने आपले स्थान बदलत असतो. शनीने 2023 च्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत गोचर केलं आहे. नुकतच 24 नोव्हेंबरला शनिदेवाने नक्षत्र बदल केला आहे. याचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येणार आहे.  (Saturn transit in Rahu constellation the people of  this zodiac sign will get huge money Shani Rahu Nakshatra)

शनीने 24 नोव्हेंबरलाच शतभिषा नक्षत्रात गोचर केलं आहे. या नक्षत्राचा अधिपती हा राहू ग्रह आहे. सध्या शनि कुंभ राशीत असून 2025 पर्यंत या राशीत विराजमान असणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. कुठल्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावर शनिदेव आपली कृपा वर्षाव करेल. 

मेष रास (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांना शनि नक्षत्र संक्रमणाचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ तुमच्या मदतीला येणार आहे. तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. या काळात तुमचा बँक बॅलन्स द्विगुणती वाढणार आहे. एवढंच नाही तर यावेळी आर्थिक लाभसह तुमची प्रगती होणार आहे. 

वृषभ रास (Taurus Zodiac) 

शनीच्या राशीत बदल झाल्यामुळे या राशीच्या लोकांसाठीही अच्छे दिन सुरु झाले आहेत. बेरोजगारांना चांगली नोकरीची संधी मिळणार आहे. इतकंच नाही तर नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यशाची संधी लाभणार आहे. परदेशातील प्रवास तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

ज्योतिषशास्त्रानुसार शनीने राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश या राशींच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला विशेष लाभ होणार आहे. या काळात तुमचं प्रेमसंबंध अधिक घट्ट आणि मजबूत होणार आहे. या राशीचं लोक करिअर इत्यादी बाबतीत नवीन उंची गाठणार आहेत. बिझनेस करणार्‍यांना यावेळी मोठा फायदा होणार आहे. अनेक क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)