Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला अद्भूत योगामध्ये करा सरस्वतीची आराधना, जाणून घ्या शुभ मुहूतसह पूजाविधी

Saraswati Puja 2024 : यंदा वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा अतिशय शुभ मुहूर्तावर करा आणि तिचा आशिर्वाद मिळवा. 

नेहा चौधरी | Updated: Feb 13, 2024, 02:05 PM IST
Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला अद्भूत योगामध्ये करा सरस्वतीची आराधना, जाणून घ्या शुभ मुहूतसह पूजाविधी title=
saraswati puja 2024 date time puja shubh muhurt significance in mararhi basant panchami

Saraswati Puja (Basant Panchami) 2024 Date, Time, Puja Muhurat, Significance in Marathi :  माघ महिन्याला सुरुवात झाली आहे. माघ गुप्त नवरात्री, माघ गणेश जयंती आणि वसंत पंचमीचा सण साजरा करण्यात येतो. वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा केली जाते. वसंत पंचमी हा सण प्रत्येक माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी करण्यात येतो. हिंदू धर्मात वसंत पंचमी माता सरस्वतीचा प्रकट दिन मानला जातो. याबरोबरच सर्व ऋतूतील सर्वोत्तम वसंत ऋतुला या तिथीपासून सुरुवात होते. जाणून घेऊया वसंत पंचमीला सरस्वती पूजा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि पिवळ्या रंगाचं महत्त्व. (saraswati puja 2024 date time puja shubh muhurt significance in mararhi basant panchami )

वसंत पंचमी तिथी 

पंचांगानुसार, माघ शुक्ल पंचमी तिथीला वसंत पंचमी 13 फेब्रुवारीला दुपारी 02:41 वाजेपासून 14 फेब्रुवारीला दुपारी 12:09 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 14 फेब्रुवारीला सरस्वती पूजा करण्यात येणार आहे. सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 07 ते दुपारी 12.41 पर्यंत असणार आहे. 

वसंत पंचमी शुभ योगायोग!

पंचांगानुसार, यंदा वसंत पंचमीच्या दिवशी रवियोगासोबत रेवती आणि अश्विनी नक्षत्राचा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. रवि योग 14 फेब्रुवारीला सकाळी 10.43 ते सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. यासोबतच रेवती नक्षत्र 13 फेब्रुवारीला दुपारी 12:35 वाजता सुरू होऊन 14 फेब्रुवारीला सकाळी 10:43 वाजेपर्यंत असणार आहे. यानंतर अश्विनी नक्षत्र सुरूवात होणार असून 15 फेब्रुवारीला सकाळी 9.26 वाजे असेल. 

सरस्वती पूजा विधी 

वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठा. त्यानंतर आंघोळ करुन पिवळे वस्त्र परिधान करा. यानंतर माता सरस्वतीची विधिवत पूजा करा. चौरंग किंवा पाट्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र पसरून सरस्वती मातेची मूर्ती किंवा चित्र ठेवा. यानंतर माता सरस्वतीला पिवळी किंवा पांढरी फुलं, हार, रोळी, हळद, कुंकू, अक्षत, पिवळ्या रंगाची मिठाई इत्यादी अर्पण करा. यानंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून देवी सरस्वतीची पूजा करा. सरस्वती मंत्र, सरस्वती चालीसा, कथा आणि शेवटी आरती करुन नैवेद्य दाखवा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाद्य, वह्या, पेन इत्यादी माता सरस्वतीला अर्पण करु त्यांचं दान करा. 

सरस्वती वंदना (Saraswati Vandana)

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥१॥
शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं।
वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌॥
हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्‌।
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्‌॥२॥

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)