Pradosh Vrat 2024 : या वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रताला दुर्मिळ योग! 'या' लोकांचं पालटणार नशीब

Pradosh Vrat 2024 : आज या वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रत अतिशय खास आहे. सिद्धी योग, षष्ठ योगासह अनेक प्रभावशाली योग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 20, 2024, 05:59 AM IST
Pradosh Vrat 2024 : या वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रताला दुर्मिळ योग! 'या' लोकांचं पालटणार नशीब title=
Pradosh Vrat

Pradosh Vrat 2024 : हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं. महिन्याला दोन प्रदोष व्रत असतं एक शुक्ल आणि एक कृष्ण पक्षाला. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोष व्रत आज असून हे सोम प्रदोष व्रत आहे. हे या वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रत आहे. आजचा सोम प्रदोष व्रताला अनेक योग जुळून आला आहे. पंचांगानुसार आज सिद्धी योग, षष्ठ योगासह अनेक प्रभावशाली योग जुळून आले आहेत. या योगामुळे काही राशींना लाभ होणार आहे. (Rare yoga for first Monday Pradosh Vrat of this year these people get money)

वृषभ रास (Taurus Zodiac) 

वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रदोष व्रत शुभ सिद्ध होणार आहे. महादेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांच्या फार पूर्वीपासूनच्या इच्छा पूर्ण होणार आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होणार आहे. तुम्हाला तुमच्या मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे. मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा व्यवहार करण्याची संधी तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले होणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

सिंह राशीच्या लोकांसाठी सोम प्रदोष व्रत खूप खास ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश आणि प्रगती होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली संधी मिळणार आहे. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय क्षेत्रात भरपूर पैसे कमविण्याची संधी मिळणार असून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac)    

सोम प्रदोष व्रत कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला सिद्ध होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही केलेल्या सर्व योजना यशस्वी होणार आहे. नोकरदार लोक त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाणार आहे. व्यवसायात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नफा मिळविण्यासाठी नवीन योजना आखणार आहात. वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होणार आहे.

मकर रास (Capricorn Zodiac)   

मकर राशीच्या लोकांसाठी सोम प्रदोष व्रत लाभदायक ठरणार आहे. मकर राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळणार आहे. नोकरीतील लोक त्यांच्या कार्यशैलीने वरिष्ठांना प्रभावित करण्यात यशस्वी होणार आहे. वैयक्तिक संबंधांसाठी प्रदोष व्रत खूप चांगला असणार आहे. व्यवसायात नवीन योजना राबवून तुमचे काम पुढे नेण्यात यश मिळणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

मीन रास (Pisces Zodiac)  

मीन राशीच्या लोकांसाठी सोम प्रदोष व्रत उत्कृष्ट परिणाम घेऊन आला आहे. सोम प्रदोष व्रत सुवर्ण योग घेऊन आला आहे. तुमच्या आरोग्याबद्दल सकारात्मक परिणाम मिळणार आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयात यश प्राप्त करणार आहे. प्रेम जीवनात असणारे जोडीदाराला कुटुंबातील सदस्यांना भेट घालणार आहे. तुमच्या नात्याला हिरवा कंदील मिळणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)