Rakshbandhan 2022: रक्षाबंधन नक्की कधी? 'या' दिवशी राखी बांधण्याची करू नका चूक

हिंदू धर्मानुसार श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधते.  भावाला राखी बांधताना बहिण त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच वेळी, भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देतात. मात्र यावर्षी पौर्णिमा 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट असा दोन दिवशी येत असल्यामुळे रक्षाबंधनाच्या तारखेबाबत बराच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे राखी नेमकी कोणत्या दिवशी बांधायची जाणून घ्या...

Updated: Aug 10, 2022, 03:32 PM IST
Rakshbandhan 2022: रक्षाबंधन नक्की कधी? 'या' दिवशी राखी बांधण्याची करू नका चूक title=

Rakshabandhan 2022: हिंदू धर्मानुसार श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधते.  भावाला राखी बांधताना बहिण त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच वेळी, भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देतात. मात्र यावर्षी पौर्णिमा 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट असा दोन दिवशी येत असल्यामुळे रक्षाबंधनाच्या तारखेबाबत बराच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे राखी नेमकी कोणत्या दिवशी बांधायची जाणून घ्या...

रक्षाबंधन हा सण पौर्णिमेलाच साजरा केला जातो. 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.37 वाजता पौर्णिमा तिथी सुरू होणार जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑगस्टला सकाळी 7 वाजता संपेल. त्यामुळे रक्षाबंधनाबाबत लोकांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला. मात्र हिंदू पंचांगानुसार, गुरुवारी, 11 ऑगस्टला पौर्णिमा असल्याने, या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधेल. या दिवशी राखी बांधण्यासाठी 12 वाजल्यानंतरची वेळ शुभ मानली आहे. या दिवशी 5:17 ते 6.18 ही वेळ शुभ आहे.  

रक्षाबंधन शुभ योग

अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:08 ते 12:59 पर्यंत
अमृत ​​काळ: संध्याकाळी 06.55 ते 08.20 पर्यंत
रवि योग: सकाळी 06:07 ते 06:53 पर्यंत