Rahu Nakshatra: राहूने केलं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

Rahu In Revati Nakshatra: राहू ग्रहाने नक्षत्र बदललं असून रेवती नक्षत्राच्या तिसर्‍या चरणात प्रवेश केलाय. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 3, 2024, 07:30 AM IST
Rahu Nakshatra: राहूने केलं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण title=

Rahu In Revati Nakshatra: ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. तर काही ग्रह नक्षत्रामध्येही गोचर करतात. यामध्ये राहू आणि केतू हे पापी ग्रह मानले जातात. अशा परिस्थितीत या दोघांच्या राशीतील बदलाचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर होतो. राहू या पापी ग्रहाबद्दल बोलायचे तर तो मीन राशीत आहे. 

राहू ग्रहाने नक्षत्र बदललं असून रेवती नक्षत्राच्या तिसर्‍या चरणात प्रवेश केलाय. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी शेवटचं नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. जाणून घेऊया राहूच्या नक्षत्र गोचरमुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहुयात. 

मेष रास (Mesh Zodiac)

राहु या राशीच्या बाराव्या घरात राहत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना सुख-समृद्धी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येणार आहेत. व्यवसायात मोठा करार होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचं नातं सुधारू शकणार आहे. आता तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक दिवसांपासून येत असलेल्या अडथळ्यांपासून आराम मिळेल. तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते.

मिथुन रास (Mithun Zodiac)

या राशीत राहु रेवती नक्षत्रात असताना दहाव्या भावात असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळणार आहे. यावेळी राहूचा जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. 

कन्या रास (Kanya Zodiac)

राहु रेवती नक्षत्रात प्रवेश करणार असून या राशीच्या सातव्या भावात वास्तव्य करणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुधही आहे. जुलैपर्यंत नवीन व्यवसाय सुरू केल्याने मोठा फायदा होऊ शकतो. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तयार असाल. नोकरदार लोकांच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. अशा परिस्थितीत पदोन्नतीसोबत काही मोठी जबाबदारीही दिली जाऊ शकते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)