मुंबई : शनीनंतर सर्वात जास्त त्रासदायक ग्रह म्हणून राहुकडे पाहिलं जातं. कुंडलीमध्ये राहु खराब असेल तर आयुष्यात संकटांचा डोंगर येऊ शकतो. असं म्हणतात की आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. इतकच नाही तर सुख शांती भंग होते.
या वर्षी राहुने कोणत्या राशीमध्ये परिवर्तन केलं नाही. मात्र पुढच्या वर्षी 12 एप्रिल रोजी राहु मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 18 वर्षांनंतर आता राहु मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचा थेट परिणाम 4 राशींवर होणार आहे. काय परिणाम होणार कोणत्या राशीला लाभ होणार जाणून घेऊया.
या राशींवर थेट होणार परिणाम
मिथुन : राहुचा मेष राशीमध्ये प्रवेश हा मिथुन राशीसाठी खूप चांगला आणि शुभ असणार आहे. आर्थिक स्थिती चांगली मजबूत होईल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे इतर मार्ग सापडतील. आपली प्रत्येक योजना यशस्वी होईल. आपल्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
कर्क : या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल मात्र तेवढाच खर्चही वाढणार आहे. तुमच्या जगण्याशी संबंधित खर्च असणार आहेत. त्यामुळे ते टाळताही येणार नाहीत. आपल्यासाठी हा काळा आनंदाचा जाणार आहे. करियरमध्ये चांगल्या संधी मिळतील. शत्रूंपासून सावध राहा.
तुळ : या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार आहे. करियर आपलं स्थिर आणि उत्तम राहणार आहे. समस्यांपासून सुटका होऊ शकते. तुमच्या आवडती नोकरी किंवा व्यवसाय तुम्हाला करण्याची संधी मिळणार आहे. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.
वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ होणार आहे. मेहनतीचं चांगलं फळ मिळणार आहे. आपल्या कामाचं कौतुक करण्यात येईल. आपल्याला इंक्रीमेंट मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो.