Rahu Ketu Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या विशिष्ट आणि ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलणार आहे. करवा चौथच्या आदल्या दिवशी दोन महत्त्वाचे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. नवग्रहांमधील सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, शुक्र, शनि आणि गुरू हे सात ग्रह पूर्ण ग्रह मानले जातात. तर दोन ग्रहांना छाया ग्रह म्हणून ओळखलं जातं. हे दोन छाया ग्रह आहेत केतू आणि राहू. हे दोन ग्रह मायावी आणि पापी ग्रह मानले जातात. शनिनंतर जाचकाला कुठल्या ग्रहाने घाम फुटत असेल तर राहू केतू हे ग्रह आहेत. (rahu and ketu transit on 30 october 2023 these zodiac sign people with crisis)
राहू हा कपटी ग्रह असून जाचकाला रातोरात श्रीमंत किंवा गरीब बनवतो. तर केतू हा रहस्यमय ग्रह मानला जातो. हा ग्रह जीवनात अलिप्तपणाचा कारक मानला जातो. त्याशिवाय केतूला धार्मिक ग्रह म्हणून संबोधलं जातं. केतू हा धर्माभिमुख आणि कर्मभिमुख ग्रह हा शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम देतो.
करवा चौथ 1 नोव्हेंबर ला साजरा होणार आहे. त्यापूर्वी 30 ऑक्टोबरला तब्बल दीड वर्षांनी राहू केतू गोचर करणार आहेत. राहू 30 ऑक्टोबरला दुपारी 2:13 वाजता मागे फिरेल आणि मेष राशीतून बाहेर पडेल. त्यानंतर देव गुरूच्या अंतर्गत येणाऱ्या मीन राशीत संक्रमण करणार आहे. तर केतू शुक्र ग्रहाच्या तूळ राशीतून बाहेर पडून बुधाच्या मालकीच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
राहू केतू गोचरमुळे या राशीच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे. वैवाहिक जीवनात वादळ येण्याची शक्यता आहे. जोडीदारामधील बदलामुळे तुम्ही अस्वस्थ असणार आहात. या काळात तुम्हाला जरा काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्याच्या समस्या डोकं वर काढणार आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडणार आहे. कार्यक्षेत्रातही काही अडचणी येणार आहे.
या राशीच्या कुंडलीत केतू दुसऱ्या भावात तर राहू अष्टमी भावात गोचर करणार आहे. या लोकांना गोचरमुळे काळजी घ्यावी लागणार आहे. अनावश्यक खर्च होत असल्याने तुमचं आर्थिक गणित चुकणार आहे. त्यामुळे तुम्ही परेशान असणार आहात. या काळात तुम्हाला मानसिक त्रासालाही समोर जावं लागणार आहे. कोर्टातील प्रकरणात अडचणी येणार आहे. या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. गाडी चालवताना काळजी घ्या. त्याशिवाय या काळात आर्थिक गुंतवणूक करताना विचार करा.
राहू आणि केतू गोचरमुळे या राशीच्या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुमचं दुर्लक्ष मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकते. त्याशिवाय या काळात अपघाताचा धोका आहे म्हणून गाडी सावधगिरीने चालवा. आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. पैसे बचतीवर जास्त लक्ष केंद्रित करा. या काळात अधिक मेहनत करुनही तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला अचडणींचा सामना करावा लागणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)