Guru And Shani Vakri: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी काही ग्रह वेळोवेळी वक्री आणि मार्गी होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. तब्बल 30 वर्षांनंतर न्याय आणि परिणाम देणारा शनि आणि समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह गुरू वक्री झाले असून उलट दिशेने फिरत आहेत.
गुरु आणि शनी या दोघांच्याही वक्री चालीचा सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहेत. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना लाभाच्या संधी आहेत. यामध्ये काही राशींच्या व्यक्तींना अचानक पैसे मिळणार आहेत. तर काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या इच्छा पूर्ण होणार आहे. जाणून घेऊया गुरु आणि शनीच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.
शनि आणि गुरूची वक्री गती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शनी तुमच्या राशीत धनस्थानावर वक्री आहे आणि गुरू चौथ्या भावात आहे. यावेळी तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळत राहणार आहेत. नोकरदार लोकांचा प्रभाव कामाच्या ठिकाणी वाढू शकतो. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकते. धनलाभ होण्याची अधिक शक्यता आहे.
शनि आणि गुरूची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचे तुमच्या आईसोबतचे संबंध चांगले राहतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहणार आहे. पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करणार आहे. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे.
शनि आणि गुरूची वक्री गती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण शनि तुमच्या राशीपासून नवव्या घरात आहे आणि गुरू उत्पन्नाच्या घरात वक्री आहे. यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही काही धार्मिक किंवा व्यवसायाशी संबंधित कारणासाठी प्रवास करू शकता. यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)