Mahadhan Yog: धनु राशीत बनला पॉवरफुल 'महाधन योग'; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Mahadhan Yog: ज्योतिष शास्त्रानुसार 27 नोव्हेंबर 2023 रोजी बुध ग्रहाने सकाळी 05:41 वाजता धनु राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रह 28 डिसेंबर 2023 पर्यंत या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत महाधन नावाचा योग तयार झाला आहे.

सुरभि जगदीश | Updated: Nov 30, 2023, 09:20 AM IST
Mahadhan Yog: धनु राशीत बनला पॉवरफुल 'महाधन योग'; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस title=

Mahadhan Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात. असाच ग्रहांचे राजकुमार ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. ज्याचा निश्चितपणे 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. 

ज्योतिष शास्त्रानुसार 27 नोव्हेंबर 2023 रोजी बुध ग्रहाने सकाळी 05:41 वाजता धनु राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रह 28 डिसेंबर 2023 पर्यंत या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत महाधन नावाचा योग तयार झाला आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण तयार होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या राजयोगाचा लाभ होणार आहे. 

मेष रास (Mesh Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी महाधन योग खूप फायदेशीर ठरू शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. शेअर्समध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाचे नियोजन करणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहेत. लहान भाऊ बहिणीकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. 

मिथुन रास (Mithun Zodiac)

या राशीसाठीही महाधन योग आनंद आणणार आहे. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. व्यवसायातही अफाट यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. नशीब पूर्ण साथ देईल. नोकरदारांना बढती आणि वेतनवाढीचा लाभ मिळू शकतो.

धनु रास (Dhanu Zodiac)

या राशीच्या लोकांसाठीही महाधन योग खूप फायदेशीर ठरू शकतो. यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. परदेशात शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यापार आणि व्यापाराशी संबंधित लोकांनाही लाभ मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. प्रलंबित पैसे मिळू शकतात. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकतं. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )