Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी अद्भूत योग! 'या' 5 राशी होणार श्रीमंत

Pitru Paksha 2023 Horoscope : पितृपक्ष पंधरवड्याला 29 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा पितृपक्ष पंधरवडा काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Sep 28, 2023, 09:45 PM IST
Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी अद्भूत योग! 'या' 5 राशी होणार श्रीमंत title=
pitru paksha 2023 rare yoga after 30 years 5 lucky zodiac signs till 14 october 2023

Shradh 2023 October Horoscope : पंचांगानुसार कृष्ण पक्ष पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरवडा सुरु होता. या पंधरादिवसात पितरांचे श्राद्ध आणि त्यांचे धार्मिक विधी तिथीनुसार केले जातात. भाद्रपद पौर्णिमे गुरुवार 28 सप्टेंबरला संध्याकाळी 6:49 वाजता सुरू झाली आहे. शुक्रवारी 29 सप्टेंबर दुपारी 3:26 वाजेरपर्यंत पौर्णिमा असणार आहे. उदय तिथीनुसार पौर्णिमा आणि पितृपक्ष हा शुक्रवारी 29 सप्टेंबरला असणार आहे. हे 15 दिवस पितरांचे स्मरण करण्यासाठी समर्पित असतात. पितृपक्ष हा 29 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 30 वर्षांनंतर पितृ पक्षात चांगले योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार या दिवसांमध्ये सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग असणार आहे. शास्त्रात हे योग अतिशय शुभ आणि फलदायी असतात. या योगाचा 5 राशीच्या लोकांना धनलाभसोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे. 

मेष (Aries Zodiac)

तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. व्यवसात फायदा होणार असून नफा मिळणार आहे. मित्र, कुटुंबाकडून भरपूर प्रेम मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? 'या' 3 दिवशी करा श्राद्ध विधी

मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशींसाठी पितृपध पंधरवडा ऑक्टोबर महिना वरदान आहे. या लोकांना चोहूबाजूने तुम्हाला आर्थिक फायदा होईल. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. बँक बॅलेन्स दिवसेंदिवस वाढणार आहे. जीवनात सुख-शांती आणि यश तुमच्या दारावर येणार आहे.

कर्क (Cancer Zodiac) 

ऑक्टोबर महिना कर्क राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात प्रगती घेऊन आला आहे. तुम्ही उंच शिखर गाठणार आहे. मान सन्मान वाढेल. गाडी किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. तुम्हाला धनलाभ होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Surya Grahan 2023 : ऑक्टोबर महिन्यात सर्वपित्री अमावस्यासोबत सूर्यग्रहण 'या' राशींसाठी ठरणार घातक

कन्या (Virgo Zodiac) 

ऑक्टोबर महिना तोही पितृपक्ष पंधरवडा कन्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील प्रगतीसोबत आर्थिक लाभ होईल. या काळात तुम्ही तुमच्या आवडीचं काम करणार आहात. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत गुणागोविंदाने राहणार आहात.

हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात मुलगी पिंडदान करु शकते का? जाणून घ्या नियम आणि विधी

कुंभ (Aquarius Zodiac) 

ऑक्टोबर महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुम्ही जुन्या समस्यातून मुक्त होणार आहात. आयुष्यातील तणाव काही प्रमाणात कमी होणार आहे. तुमच्यावरील आर्थिक बोज कमी होणार असून बँक बॅलेन्स चांगल्या स्थितीत येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी समाधान आणि शांती घेऊन येणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2023 : पितृपक्षात अशी स्वप्नं दिसणं म्हणजे शुभ संकेत! पण ही स्वप्नं असतात संकटांचा इशारा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)